पॅरिस ऑलिम्पिक पदकाची भारतीय खेळाडूने केली पोलखोल, दोन महिन्यातच पदक...

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. या विजयाला आता दोन महिनेला झाले असून भारतीय हॉकी संघाचा मिडफिल्डर हार्दिक सिंह ने पदकाबाबत मोठा खुलासा केला आहेत.   

राजीव कासले | Oct 09, 2024, 11:49 AM IST
1/8

पॅरिस ऑलिम्पिक पदकाची भारतीय खेळाडूने केली पोलखोल, दोन महिन्यातच पदक...

2/8

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास रचत कांस्य पदक पटकावलं. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक पटकाण्याची कामगिरी भारताने केली.  

3/8

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने बलाढ्य स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्य पदकाची कमाई केली.

4/8

या विजयाला आता दोन महिने झालेत. आता पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाने पटकावलेल्या या कांस्य पदकाची चर्चा सुरु झाली आहे. 

5/8

याचं कारण ठरलं भारतीय हॉकी संघाचा स्टार हॉकी खेळाडू हार्दिक सिंह. हार्दिकने पदकाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

6/8

एका पॉडकास्ट मुलाखतीत भारतीय मिडफिल्डर हार्दिकने पदकांच्या गुणवत्तेबाबत मोठा खुलासा केला. अवघ्या दोन महिन्यात या पदकावरचा रंग उडून गेला आहे. 

7/8

हार्दिकने सांगितलं, या पदकात आयफल टॉवरचं लोखंड मिसळवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. चांगल्या गुणवत्तेची पदकं बनवणं हे त्यांचं काम होतं, पण असं झालं नाही.  

8/8

11 ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप झाला. तर याची सुरुवात 26 जुलैला झाली होती. अशात दोन महिन्यात पदक खराब झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.