डेस्टिनेशन नव्हे, आता करा Space Wedding; लग्नानंतर खरंच म्हणाल 'चंद्र आहे साक्षीला'

Destination wedding : डेस्टिनेशन वेडिंग, नवनवीन संकल्पना आणि बरंच काही डोक्यात असतं. आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसासाठी तितकेच खास आणि लाथामोलाचे बेत आखले जातात. यातच आता आणखी एका भन्नाट संकल्पनेची भर पडत आहे. 

| May 19, 2023, 13:12 PM IST

Space Wedding : एखादं प्रेमाचं नातं जेव्हा लग्नापर्यंत पोहोचतं तेव्हा त्या नात्याला वेगळीच लकाकी मिळते. मुळात लग्नबंधनात अडकण्याचा दिवस आखताना तो अविस्मरणीय कसा ठरेल यासाठीच सर्वजण जीवाचा आटापिटा करत असतात. 

1/7

Space Wedding

Space Wedding an option to  destination wedding know details cost and plan

Space Wedding : प्रेमाच्या या नात्यात लग्न कुठे करायचं? असा प्रश्न प्रिय व्यक्तीनं केल्यास, त्या आकाशाच्या मंडपात, ताऱ्यांच्या सजावटीत आपण लग्न करायचं असं गोड उत्तर तुमच्यापैकी अनेकांनीच दिलं असेल. 

2/7

अवकाशात लग्न

Space Wedding an option to  destination wedding know details cost and plan

आता हे प्रत्यक्षात शक्य आहे. आकाशच काय, थेट अवकाशात जाऊन तुम्हाला लग्न करता येणार आहे. प्रेमाच्या नात्यात बऱ्याचदा साथीदार झालेला चंद्रही तुमच्या या नात्याची साक्ष देईल. 'स्पेस वेडिंग'च्या ट्रेंडमुळं भविष्यात हेसुद्धा सहज शक्य होणार आहे. 

3/7

स्पेस पर्सपेक्टिव्ह

Space Wedding an option to  destination wedding know details cost and plan

स्पेस पर्सपेक्टिव्ह या कंपनीकडून ही संकल्पना आकारास आणली जात असून, सध्या तिला अनेकांनीच पसंती दिल्याचं कळत आहे. किंबहुना कंपनीकडे अंतराळात जाऊन लग्न करु इच्छिणाऱ्या जोड्यांची यादीच तयार आहे. तेव्हा या यादीतून पहिला मान कोणाला मिळतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे.   

4/7

स्पेस बलून्स

Space Wedding an option to  destination wedding know details cost and plan

खास स्पेस बलून्सच्या माध्यमातून नेपच्युन नावाचं स्पेस कॅप्स्युल अंतराळाच्या दिशेनं झेपावेल. प्रती तास 19 किलोमीटर इतक्या वेगानं जाणाऱ्या या बलूनमध्ये बसलं असता प्रवाशांना विमानाइतकीच सुरक्षितता भासेल. 

5/7

अंतराळ संस्थांकडून वापर

Space Wedding an option to  destination wedding know details cost and plan

मुख्य म्हणजे स्पेस पर्सपेक्टिव्हच्या या संकल्पनेचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ नसेल. मागील काही वर्षांपासून अगदी नासापासून काही सरकारी अंतराळ संस्थांकडून त्याचा वापर होत आहे. 

6/7

तुम्हालाही याचा अनुभव घ्यायचाय?

Space Wedding an option to  destination wedding know details cost and plan

तुम्हालाही याचा अनुभव घ्यायचाय? इथं पृथवीवर तुम्ही लग्न उरकता त्याच्या कैक पटींनी तुम्हाला अंतराळात लग्न करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. प्राथमिक माहितीनुसार याची किंमत 125000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1.03 कोटी रुपये इतका आहे. 

7/7

पृथ्वी आणि संपूर्ण अंतराळाचं भारावणारं दृश्य

Space Wedding an option to  destination wedding know details cost and plan

कॅप्स्युलला असणाऱ्या खिडकीमुळं त्यातून तुम्ही सहजपणे पृथ्वी आणि संपूर्ण अंतराळाचं भारावणारं दृश्य पाहू शकता. तिथं साता जन्माची साथ देण्याचं वचन एकमेकांना देत असतानाच अवकाशातील ग्रहताऱ्यांची साक्ष तुमच्या नात्याला खऱ्या अर्थानं चार चाँद लावेल, नाही का? मग, विचार काय करताय.... होऊ द्या खर्च. (सर्व छायाचित्र छाया सौजन्य- स्पेस पर्सपेक्टिव्ह/ फ्रीपिक)