Shani Jayanti 2023 : शनि जयंतीला 3 राजयोग, 30 वर्षांनी 'शोभना राजयोग'मुळे 'या' राशी होणार मालामाल

Shani Shash Mahapurush Yog : शनि जयंती काही राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. 

May 19, 2023, 09:59 AM IST

Shani Jayanti 2023 Positive Impact on Zodiac Signs : शनिचं नाव घेतलं तरी अनेकांना घाम फुटतो. पण शनि जयंतीला (Shani Gochar 2023) तयार होणारे शुभ राजयोग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

1/10

दुर्मिळ तीन राजयोग

शनि जयंतीला अतिशय दुर्मिळ असे तीन राजयोग जुळून आले आहेत. गजकेसरी योग, शोभन योग आणि शश राजयोग तयार झाले आहेत. 

2/10

कर्माचे फळ

शनिदेव हा व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देत असतो. शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि ग्रह हा एका राशीत जवळपास अडीच वर्षे राहतो. 

3/10

कुंभ राशीत किती वर्ष?

सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहे. तो कुंभ राशीत 2025 पर्यंत राहणार आहे. 

4/10

या राशींचं भाग्य उजळणार

शनि जयंतीला तीन राजयोग काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कुठल्या राशींवर शनिची कृपा बरसणार आहे पाहूयात

5/10

तूळ (Libra)

या राशींचं उत्पन्न वाढणार असून त्यांना धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंद आणि सुख - समृद्धी वाढणार आहे. 

6/10

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी शनि जयंती अतिशय लाभदायक ठरणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचं फळ मिळणार आहे. 

7/10

कुंभ (Aquarius)

या राशीत शश महापुरुष योग तयार होत आहे. आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे.   

8/10

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात व्यवसायातून नफा होणार आहे. अडचणींवर सहज मात करणार आहात. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. 

9/10

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. अनेक मार्गाने पैशांचा ओघ वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे.

10/10

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी आनंदाचे दिवस सुरु होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती होणार आहे. अडकलेली कामं वेळेत पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)