इथं पाण्याचा नव्हे, दारुचा पाऊस पडतो; नासाचं भन्नाट संशोधन

World News : इथं संपूर्ण जग चांद्रयान 3 च्या प्रवासातील शेवटच्या टप्प्याकडे लक्ष लावून राहिलेले असतानाच दुसरीकडे नासाकडून अशी माहिती समोर आली आहे जी पाहता तुम्हीही थक्क व्हाल.   

Aug 11, 2023, 12:55 PM IST

World News : जगभरात घडणाऱ्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. यातील प्रत्येक घटनेमागे काही कारण असतं. किंवा मग थक्क करणारे संदर्भ असतात. असेच संदर्भ नासाच्या हाती लागले आहेत. 

 

1/7

विज्ञानाच्या बळावर....

space news alcohol rain clouds nasa discovery

विज्ञानाच्या बळावर आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात येऊ शकतात हेच इथं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.   

2/7

एक सोपा प्रश्न...

space news alcohol rain clouds nasa discovery

एक सोपा प्रश्न, तुम्ही कधी पाऊस पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल हा प्रश्न आहे का? पाऊस, हिमवृष्टी या रुपात आभाळातून बरसणारा निसर्गाचा हा चमत्कार आपण सर्वांनीच पाहिला आहे. पण, कधी दारुचा पाऊस पाहिलाय का?   

3/7

जाणून आश्चर्य वाटेल...

space news alcohol rain clouds nasa discovery

जाणून आश्चर्य वाटेल, पण एक असंही ठिकाण आहे, जिथं चक्क दारुचा पाऊस पडतो. हा एक ग्रह असून, तुम्ही जिथं कुठं असाल तिथं प्रत्येक ठिकाणी दारुच दारु दिसेल.   

4/7

नासाकडून खुलासा

space news alcohol rain clouds nasa discovery

नासाकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला असून, Alcohol चं हे प्रमाण सूक्ष्म रुपात पाहिल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अवकाशात प्रोपेनॉलच्या रुपात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अल्कोहोल अणू ठरला आहे. असं असलं तरीही हा घटक अजिबातच पिण्याजोगा नाही.   

5/7

NASA च्या माहितीनुसार...

space news alcohol rain clouds nasa discovery

NASA च्या माहितीनुसार हे क्षेत्र आपल्या आकाशगंगेच्या अतिशय जवळ असून इथंच आपल्या आकाशगंगेचा एक मोठा ब्लॅकहोल आहे. पृथ्वीपासून हा कथित ग्रह साधारण 170 प्रकाश वर्षे दूर आहे.   

6/7

टेलीस्कोप

space news alcohol rain clouds nasa discovery

अटाकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर एरे टेलीस्कोपनं या अल्कोहोलचा पाऊस होणाऱ्या ग्रहाबद्दल शोध लावला होता. 2016 पासून नासा सातत्यानं तेथील सर्व हालचालींवर नजर ठेवून आहे. 

7/7

मोठी बाब म्हणजे...

space news alcohol rain clouds nasa discovery

तज्ज्ञांच्या मते प्रोपेनॉलच्या दोन रुपांचं एकत्र येणं ही अतिशय मोठी बाब असून, ते अतिशय शक्तिशाली असल्याचंही म्हटलं जात आहे.