Photos: धावत्या Scorpio च्या बोनेटवर स्टंटबाजी! भरला 2 Wheeler च्या किंमती इतका दंड

Stunt On Scorpio Car Viral Reel: सोशल मीडियावर रील बनवण्याचा क्रेझ सध्या तरुणाईमध्ये दिसून येतो. दिवसोंदिवस हा क्रेझ वाढत असून याच्या नादात अनेकजण नियम विसरतात आणि स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात घातला. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये रीलमध्ये दिसणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भात सविस्तर...

Swapnil Ghangale | Aug 11, 2023, 10:25 AM IST
1/7

Uttar Pradesh Crime bareilly youth stunt on 2 Scorpio car on highway reel viral police take action

बरेलीमधील काही तरुणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 2 तरुण वेगवेगळ्या कार्सच्या बोनेटवर उभे असल्याचं दिसत आहे. दोघेही धावणाऱ्या कार्सवर ही स्टंटबाजी करताना दिसत आहे.

2/7

Uttar Pradesh Crime bareilly youth stunt on 2 Scorpio car on highway reel viral police take action

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीवर स्टंटबाजी करताना दिसत आहे. 

3/7

Uttar Pradesh Crime bareilly youth stunt on 2 Scorpio car on highway reel viral police take action

धावत्या स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर एकजण उभा आहे. तर अन्य एकजण खिडकीतून अर्ध अंग बाहेर काढून हात उंचावताना दिसत आहे. मात्र अशाप्रकारे वाहतुकीचे नियम मोडून स्टंटबाजी करण्याचा हा प्रयत्न या तरुणांनाच चांगलाच महागात पडला आहे. 

4/7

Uttar Pradesh Crime bareilly youth stunt on 2 Scorpio car on highway reel viral police take action

रीलसाठी शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये डोंगररांगा आणि नदीही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीतरी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कारवाईला वेग आला.  

5/7

Uttar Pradesh Crime bareilly youth stunt on 2 Scorpio car on highway reel viral police take action

उत्तर प्रदेश पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात मोहिम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत त्यांना बरेलीमधील काही तरुणांनी धावत्या गाड्यांच्या बोनेटवर स्टंटबाजी केल्याची माहिती मिळाली असता या तरुणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

6/7

Uttar Pradesh Crime bareilly youth stunt on 2 Scorpio car on highway reel viral police take action

पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये स्टंटबाजी करण्यात आलेली एक कार जैद खानच्या नावावर रजिस्टर आहे तर दुसरी प्रमोद शर्माच्या नावावर रजिस्टर असल्याचं समोर आलं. या दोन्ही कारमालकांना पोलिसांनी प्रत्येकी 52 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

7/7

Uttar Pradesh Crime bareilly youth stunt on 2 Scorpio car on highway reel viral police take action

मात्र हा व्हायरल झालेला व्हिडीओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आलेली नाही. हा व्हिडीओ हायवेवर शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील हे तरुण कोण आहेत याची संपूर्ण माहितीही देण्यात आलेली नाही.