PHOTO : 3 लग्न, 4 मुलं अन् 2 घटस्फोट... आंध्रप्रदेश गाजवणाऱ्या पवन कल्याणची एक पत्नी रशियन, एकीला दिलीये 5 कोटींची पोटगी

Pawan Kalyan Controversial Married Life : साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पवन कल्याण हे चिरंजीवी याचा भाऊ असून त्यांची लव्ह लाइफ खूप चर्चेत आहे. 

Jun 14, 2024, 16:12 PM IST
1/7

दक्षिणेचा सुपरस्टार पवन कल्याण यांनी चित्रपट कारकिर्दीत सुपरहिट ठरल्यानंतर आता राजकारणातही ते उंच शिखरावर पोहोचले आहेत. आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 

2/7

पवन कल्याण यांच्या लव्ह लाइफची सध्या चर्चा होतेय. कारण शपथविधी सोहळ्यात रशियन बायकोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहितीय. 

3/7

पवन कल्याण यांनी एक-दोन नव्हे तर तीन लग्न झालीय. त्यांचं वैवाहिक जीवन सोपं नव्हतं. पहिल्या पत्नीने त्यांना कोर्टात खेचून घटस्फोट दिला. त्यानंतर एका अभिनेत्रीशी दुसरं लग्न केलं. तेही फार काळ टिकलं नाही. त्यानंतर रशियन मॉडेलशी त्यांनी लग्न केलंय. 

4/7

पवन कल्याण एका संस्थेत काम करत असताना त्यांची भेट नंदिनीशी झाली. मैत्री आणि नंतर प्रेम झालं. चित्रपटांमध्ये पदार्पण केल्यानंतर वर्षभरात त्यांनी नंदिनीशी लग्न केलं. पण लग्नानंतर त्यांच्या नात्यात प्रेमऐवजी भांडणाने जागा घेतली. घटस्फोट न घेता पवन यांनी अभिनेत्री रेणू देसाईशी लग्न केल्याचा आरोप नंदिनी यांनी केला. 

5/7

एवढंच नाही तर हा वाद न्यायालयात पोहोचला. त्यावेळी पवन यांनी कोर्टात सांगितलं की, ते विवाहित नसून नसून रेणू देसाईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. त्यानंतर पवन आणि नंदिनी यांचा 2008 मध्ये घटस्फोट झाला. पवन यांना नंदिनीला 5 कोटी पोटगी द्यावी लागली. 

6/7

त्यानंतर 2009 मध्ये पवन यांनी रेणू देसाईशी लग्न केलं. रेणू आणि पवन यांचं नातंही लग्नानंतर फार काळ टिकलं नाही. कौटुंबिक कारणांमुळे त्यांच्यामध्ये वाद सुरु झालेत. पवन हे आपल्या भावाची आर्थिक मदत करतात हे रेणू यांना मान्य नव्हते. त्यानंतर 2012 मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोटानंतरही दोघांनी चित्रपटात एकत्र काम करत होते. रेणू आणि पवन कल्याण यांना अकिरा नंदन नावाचा मुलगा आहे. 

7/7

घटस्फोटानंतर पवन कल्याण यांची रशियन मॉडेल आणि अभिनेत्री ॲना लेझनेवा यांची भेट झाली. दोघे चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि शूटिंगदरम्यान त्यांची जवळीक वाढली. घटस्फोटाच्या एका वर्षानंतर पवनने 2013 मध्ये ॲनासोबत लग्न केलं.