शत्रुघ्न सिन्हा यांच्या 210 कोटींच्या संपत्तीतून सोनाक्षीला मिळणार नाही एकही रुपया, 'कारण तिने...'
शत्रुघ्न सिन्हा हे केवळ प्रसिद्ध अभिनेताच नाही तर खासदारही आहेत. त्यांची बिहार, मुंबईतच नाही तर मेहरौली, डेहराडून आणि दिल्लीतही कोटींची मालमत्ता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी खुलासा केलाय की, ते त्यांच्या संपत्तीमधील वाटा मुलगी सोनाक्षीला देणार नाहीत.
नेहा चौधरी
| Jul 04, 2024, 09:49 AM IST
1/7
शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांचं कुटुंब सोनाक्षी सिन्हाच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे. सोनाक्षीने झहीर इक्बाल केल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. तिच्या लग्नाला तिचे भाऊ लव कुश उपस्थितीत नव्हते. मग ते सोनाक्षीच्या लग्नाचा विरोधात होते का? त्यात शत्रुघ्नने स्वतः सांगितलं होतं की, मुलीच्या आनंदासाठी त्यांनी लग्नाला होकार दिला आहे. पण आता संपत्तीबद्दल त्यांनी मोठा खुलासा केलाय.
2/7
शत्रुघ्न सिन्हा यांचं बिहार आणि मुंबईतच नाही तर मेहरौली, डेहराडून आणि दिल्लीतही मालमत्ता आहे. 77 वर्षीय शत्रुघ्न सिन्हा यांची 210 कोटी संपत्ती असल्याच निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचा आढावा दिला होता. पण या संपत्तीमधील एकही रुपया ते आपली मुलगी सोनाक्षीला देणार नाही आहेत. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने केलाय.
3/7
शत्रुघ्न सिन्हा यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा हे 5 मोठ्या घरांचे मालक आहेत. पटना, मुंबई, मेहरौली, डेहराडून आणि दिल्ली इथे त्यांची मालमत्ता आहे. त्यांच्या मुंबईतील ‘रामायण’ या घराची किंमत 88 कोटींच्या घरात आहे. मग ते मुलगी सोनाक्षीला एकही रुपया का देणार नाहीत?
4/7
खरं तर, एका मुलाखतीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या मालमत्तेत लव कुशसह सोनाक्षीला किती वाटा देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले होती की, 'मी माझ्या मुलीला काहीही देणार नाही. माझी मुलगी आता स्वावलंबी आहे आणि चांगली कमाई करते. तिला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि मला तिचा अभिमान आहे. शिवाय माझ्या मुलीने स्पष्ट सांगितलंय की तिला माझ्याकडून कशाचीही गरज नाही आणि मला तिच्या या विश्वासाचा अभिमान आहे. आजपर्यंत तिने जे काही मिळवलंय, ते तिने स्वत:च्या बळावर केलंय आणि ती सदैव आनंदी राहो हीच मी प्रार्थना करतो.'
5/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हाने मुंबईत एक अपार्टमेंट घेण्यासाठी तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून 11.58 कोटी रुपये उधार घेतले होते. या घराची एकूण किंमत 14 कोटी रुपयांच्या घरात आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर दोघांनीही नव्या आयुष्याला सुरुवात केलीय. झहीर इक्बालला इंडस्ट्रीत फारशी ओळख मिळाली नसली तरी त्याचे वडील मोठे उद्योगपती आहेत.
6/7