Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?

Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल.   

Jul 04, 2024, 09:46 AM IST

Ashadhi Wari 2024 : बोलावा विठ्ठल... पाहावा विठ्ठल... असं म्हणत विठ्ठलाचं नाव मुखी ठेवत असंख्य वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 

1/8

आषाढी

Ashadhi Ekadashi 2024 wari saint dnyaneshwar palkhi saswad to jejuri photos

Ashadhi Wari 2024 : आषाढी एकादशी अवघ्या 12- 15 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना आता विठ्ठलभेटीची आस घेऊन वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांचा उत्साह दिवसागणिक शिगेला पोहोचताना दिसत आहे.  

2/8

वारकरी पुढे मार्गस्थ

Ashadhi Ekadashi 2024 wari saint dnyaneshwar palkhi saswad to jejuri photos

दिवेघाटाची कठीण चढाई केल्यानंतर आता हे वारकरी पुढे मार्गस्थ झाले आहेत. थकूनभागून कुठे विश्रांती घेत आहेत. पोटाची भूक भागवण्यासाठी सर्वांच्या सहकार्यानं मीठ-भाकर खाऊन पोट भरत आहेत.   

3/8

नात्यांची वारी

Ashadhi Ekadashi 2024 wari saint dnyaneshwar palkhi saswad to jejuri photos

वारीच्या या प्रवासातले अनेक चेहरे खरंतर अनोळखी. पण, तरीसुद्धा हे चेहरे पाहताना मामा, मावशी, काका, तात्या असं म्हणत नकळत त्यांच्याशी एक नातं तयार झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं खऱ्या अर्थानं ही नात्यांचीसुद्धा वारीच.   

4/8

पालखी

Ashadhi Ekadashi 2024 wari saint dnyaneshwar palkhi saswad to jejuri photos

सध्याच्या घडीला पंढरीच्या दिशेनं निघालेली ही वारी अर्थात संत ज्ञानेश्वर यांची पालखी सासवडचा पाहुणचार आटोपून जेजुरीच्या रोखानं पुढे निघाली आहे.   

5/8

जेजुरी नगरीत आगमन

Ashadhi Ekadashi 2024 wari saint dnyaneshwar palkhi saswad to jejuri photos

माऊलींच्या पालखी रथासमोरच्या दिंड्यांचं जेजुरी नगरीत हळुहळू आगमन होतंय. टाळ मृदुंगाचा गजर करत हरिनामाचा जयघोष करत वारकरी जेजुरी नगरीत दाखल होत आहेत.   

6/8

मिलाप

Ashadhi Ekadashi 2024 wari saint dnyaneshwar palkhi saswad to jejuri photos

आज माऊलींचा खंडोबाच्या जेजुरी नगरीत भंडाराची मुक्त उधळण करून स्वागत केले जाणार आहे. शैव आणि वैष्णव पंथांचा अनोखा मिलाप आज जेजुरी नगरीत अनुभवायला मिळणार आहे.    

7/8

जेजुरीत भक्तांची मांदियाळी

Ashadhi Ekadashi 2024 wari saint dnyaneshwar palkhi saswad to jejuri photos

माऊलींच्या पालखीववर जेजुरीनगरीत भंडाऱ्याची उधळण करण्यात येईल. पालखीचा आजचा मुक्काम जेजुरीतच असेल. माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी जेजुरीकर सज्ज झाले असून, पालखीच्या दर्शनासाठी दुरून भाविकही जेजुरीत येताना दिसत आहेत.       

8/8

पुढचा प्रवास

Ashadhi Ekadashi 2024 wari saint dnyaneshwar palkhi saswad to jejuri photos

जेजुरीवरून पुढं माऊलींची पालखी नीरा स्थानासाठी रवाना होईल. असंख्य वारकऱ्यांची साथ यावेळी असणार आहे. वारीतला प्रत्येक क्षण मनात एक समाधानाची भावना जागृत करून जात आहे. अशी ही वारी तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन अनुभवता येत नसली तरीही झी24 तासच्या माध्यामातून तुम्ही ची याचिदेही, याचीडोळा पाहू शकता, अनुभवू शकता आणि वारी जगू शकता. जय हरि विठ्ठल!!!