Salman Khan Secrets: 'सिगारेटचे चटके, सर्वांसमोर अपमान...'; सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचे धक्कादायक खुलासे

अभिनेता सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहीला आहे. सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याची अतिशय डार्क बाजू जगासमोर आणले आहेत. सलमान खानचे Dark Secret. 

पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) ने बॉलिवूडमधील अनेक उत्कृष्ठ सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र सोमी अली सगळ्यात जास्त सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिली होती. सोमी अली आणि सलमान खानच्या नात्याची सुरुवात 1991 साली झाली. दोघांनी 1999 पर्यंत एकमेकांना डेट केलं. 8 वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये या दोघांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. पण सलमानच्या जीवनात ऐश्वर्या आली तेव्हा यांचा ब्रेकअप झाला.  नुकतीच सोमी अलीने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने सलमान खानच्या जीवनातील डॉर्क सिक्रेट सांगितले आहेत. 

1/7

सोमी अलीला धोका

सोमीने मुलाखतीत सांगितलं की, 'हम दिल दे चुके' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ऐश्वर्या आणि सलमान यांच्यामध्ये प्रेम फुलू लागलं. ही बातमी सोमीला नोकरांकडून समजली होती. 

2/7

संजय लीला भन्सालीने...

सोमी अलीने सांगितलं की, 'हम दिल दे चुके' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जेव्हा सलमानला फोन केला तेव्हा तो फोन भंसाली सरांनी उचलला होता.' त्यांनी सांगितलं की, सलमान सध्या शूट करत आहे. तो बोलू शकत नाही. पण जेव्हा मी त्यांना प्रश्न केला की, सीन कोण डिरेक्ट करत आहे तेव्हा त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. 

3/7

सलमान-ऐश्वर्याची जवळीक

सोमी अलीने सांगितले की, ऐश्वर्या राय गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सलमान खानच्या जिममध्ये येऊ लागली होती. यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा जोरात व्हायला लागली. 

4/7

मारहाणीचा आरोप

एका मुलाखताती सोमी अलीने सांगितले की, सलमान खान सेडिस्ट आहे. सलमान खान सोमीला घाणेरड्या पद्धतीने मारत असे आणि शिव्या देखील घालत असे. एवढंच नव्हे तर सलमान खान सिगारेटचे चटके देखील देत असे.   

5/7

मोडलं लग्न

सोमी अलीने मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि संगीता बिजलानी यांच्या लग्नाचे कार्ड देखील छापले होते. पण या दरम्यान सलमान खान सोमी अलीला जास्त भेटू लागला. यामुळे सलमान आणि संगीता बिजलानी यांच लग्न मोडलं. 

6/7

दोघांना एकत्र पाहिलं

एवढंच नव्हे तर सोमी अलीने सांगितलं की, संगीता बिजलानीने सलमान खान आणि मला एका खोलीत एकत्र पाहिलं होतं. ज्यानंतर सलमानने अवघ्या 10 मिनिटांत सोमीसोबतच नातं तोडलं होतं. 

7/7

अपमान

सोमी अलीने एका मुलाखतीत सांगितलं की, सलमान त्याच्या मित्र परिवारासमोर किंवा इतर लोकांसमोर आली गर्लफ्रेंड मानत नसे. एवढंच नाही तर, तो सगळ्यांसमोर माझा अपमान करायचा.