अंतराळात फ्रेशर्स पार्टी! International Space Station वर अंतराळवीरांचे जल्लोषात स्वागत; 4 जण पृथ्वीवर परतणार

 International Space Station वर अंतराळवीरांचे पथक सहा-सहा महिने राहून विविध वैज्ञानिक प्रयोग करत आहे. 

Aug 28, 2023, 00:07 AM IST

International Space Station : एकीकडे चंद्रावर भारताची चांद्रयान 3 मोहिमि यशस्वी पल्ले गाठत असताना दुसरीकडे अंतराळात फ्रेशर्स पार्टी सुरु आहे.  एलन मस्क यांची स्पेस एजन्सी स्पेस-एक्सने चार देशांतील चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station पाठवले आहे. 

1/7

फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून  तब्बल 29 तासांचा प्रवास करुन स्पेस-एक्स रॉकेट International Space Station वर पोहचले. 

2/7

International Space Station वर कार्यरत चार अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत. 

3/7

 International Space Station मध्ये चंद्र, मंगळ आणि त्यापुढील मिशनच्या तयारीसाठी 200 हून अधिक प्रयोग आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. 

4/7

 क्रू-7 मध्ये NASA अंतराळवीर स्टीफन बोवेन, वुडी होबर्ग आणि फ्रँक रुबियो, तसेच संयुक्त अरब अमिरातीचे अंतराळवीर सुलतान अल्नेदी आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर सर्गेई प्रोकोपिएव, दिमित्री पेटलिन आणि आंद्रे फडेयेव्ह यांचा समावेश आहे.   

5/7

हार्मनी मॉड्यूलच्या स्पेस-फेसिंग पोर्टवर स्वायत्तपणे डॉक करण्यासाठी International Space Station कार्यरत अंतराळवीर सज्ज होते. 

6/7

NASA अंतराळवीर जास्मिन मोगबेली, ESA (युरोपियन स्पेस एजन्सी) अंतराळवीर अँड्रियास मोगेनसेन, JAXA (जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी) अंतराळवीर सातोशी फुरुकावा आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर कॉन्स्टँटिन यांचा समावेश आहे.  

7/7

नासाच्या अंतराळवीरांव्यतिरिक्त डेन्मार्क, जपान आणि रशियाचे अंतराळवीर 6 महिन्यांच्या मोहिमेसाठी International Space Station गेले आहेत.