Solar Eclipse 2024 : वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 'या' दिवशी, ग्रहणांचे किती प्रकार असतात?
Solar Eclipse 2024 : 2024 या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण हे एप्रिल महिन्यात लागणार आहे. ग्रहणाच्या सगळ्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Feb 21, 2024, 12:58 PM IST
Solar Eclipse Types : सूर्यग्रहणाला ज्योतिष शास्त्रात आणि वैज्ञानिक भाषेत अधिक महत्त्व आहे. ग्रहणाचा देश-विदेशात शुभ-अशुभ प्रभाव पडत असतो. चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधून जातो तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येत नाही, या भौगोलिक घटनेला सुर्यग्रहण म्हटले जाते. शास्त्रानुसार, ग्रहण कधीच शुभ किंवा अशुभ असत नाही. 2024 मधील पहिले सूर्यग्रहण हे एप्रिल महिन्यात दिसणार आहे. याची तिथी जाणून घेऊया. तसेच ग्रहणाचे किती प्रकार असतात ते पाहूया.
1/7
सूर्यग्रहणादरम्यान काय टाळाल
सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये, तसेच सूर्यग्रहण कधीच डोळ्यांनी पाहू नये. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. तसेच ग्रहणकाळात शिवणकाम व विणकाम करू नये. या काळात नखे कापू नयेत. मंदिरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तीला हात लावू नयेत पण इच्छा असल्यास मंत्रजप करू शकता. ग्रहणकाळात किचनशी संबंधित काम जसे की स्वयंपाक वगैरे करू नये.
2/7
वर्षाचे पहिले सूर्यग्रहण
3/7
संपूर्ण सूर्यग्रहण म्हणजे काय?
संपूर्ण सूर्यग्रहण म्हणजे काय ते जाणून घेऊया. ग्रहणाच्या वेळी, कधीकधी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा चंद्र काही काळासाठी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यापासून पूर्णपणे अवरोधित करतो. या स्थितीत चंद्राची पूर्ण सावली पृथ्वीवर पडते ज्यामुळे तो जवळजवळ गडद दिसतो. सूर्याच्या या अवस्थेला संपूर्ण सूर्यग्रहण म्हणतात.
4/7
आंशिक सूर्यग्रहण
5/7
रिंग ऑफ फायर
6/7
भारतात दिसणार नाही
या वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारत आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये दिसणार नाही. सूर्यग्रहण पश्चिम युरोप पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक मेक्सिको, उत्तर अमेरिका कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, इंग्लंडचा उत्तर पश्चिम प्रदेश आणि आयर्लंडमध्ये दिसणार आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, संपूर्ण सूर्यग्रहणाचा मार्ग वायव्य मेक्सिकोपासून अमेरिकेतून दक्षिणपूर्व कॅनडापर्यंत जाईल. तो मार्ग सरासरी 115 मैल (183 किलोमीटर) रुंद असेल. एकूण सूर्यग्रहण 4 मिनिटे 28 सेकंद असेल. या काळात दिवसा अंधार जाणवेल.
7/7