सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध

यवतमाळच्या पांढरकवडा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी १ उर्फ अवनी या वाघिणीला ठार मारल्यामुळे वन विभागावर टीकेची झोड उठली आहे.

Nov 04, 2018, 12:27 PM IST

यवतमाळच्या पांढरकवडा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी १ उर्फ अवनी या वाघिणीला ठार मारल्यामुळे वन विभागावर टीकेची झोड उठली आहे.

1/7

सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध

टी १ वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न न करताच तिला गोळ्या घालण्यात आल्या. तसेच तिला मारताना अनेक नियमांचेही उल्लंघन करण्यात आले, असा वन्यप्रेमींचा आरोप आहे. 

2/7

सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध

यानंतर सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. 

3/7

सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध

या वाघिणीने गेल्या दोन वर्षांमध्ये १३ जणांना ठार मारले होते. त्यापैकी नऊ जणांची शिकार टी-१ आणि तिच्या बछडय़ांनी केली, असा वन खात्याचा दावा होता. 

4/7

सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध

या वाघिणीला ठार मारण्यासाठी प्रसिद्ध शिकारी शाफत अली खान यांनादेखील पाचारण करण्यात आले होते. याशिवाय, विशेष प्रशिक्षण दिलेले इटालियन कुत्रेही वाघिणीच्या मागावर सोडण्यात आले होते. मात्र, तरीही महिनाभरापासून ही वाघीण शोध पथकांना गुंगारा देत फिरत होती. 

5/7

सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध

या वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. पाच शार्प शुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज या ठिकाणी होती.

6/7

सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध

अवनीला ठार मारण्याऐवजी तिला जेरबंद करायला पाहिजे होते, असे अनेकांचे मत आहे.

7/7

सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध

वाघिणीला ठार मारल्यानंतर तिच्या बछड्यांचे काय होणार, असा सवाल वन्यप्रेमींकडून उपस्थित करण्यात आला.