पोटाची चरबी कमी करायचीये? रोज करा 'ही' योगासने, पाहा मग फरक

Yoga For Reduce Belly Fat :  दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. याचनिमित्ताने आपण जे लोक जास्त वेळ बसून काम करतात. त्यांसाठी काही योग प्रकार सांगणार आहोत. जेणेकरुन वाढते वजन तसेच पोटाची चरबी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. योगामुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाहीतर मनालाही शांतात मिळते. योग हा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असून शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि स्नायूंना बळकटीही मिळते. मग जाणून घ्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त योगासने आणि त्यांचे फायदे.

Jun 21, 2023, 10:17 AM IST
1/8

गंभीर आजाराची शक्यता...

Yoga Asanas To Reduce Belly Fat

वाढलेले पोट तुम्ही वेळीच कमी करू शकलात नाहीतर तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या वजनामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग इत्यादी आजार होऊ शकतात. पण घाबरण्याचे कारण नाही. पोटातील चरबी कमी करण्यासाठी, तुम्हाला योग्य आहार आणि व्यायामाची गरज आहे. 

2/8

नौकासन (Naukasana)

Yoga Asanas To Reduce Belly Fat

या आसनामुळे पोटाची चरबी कमी होण्यास चांगली मदत मिळते. कारण या आसनामध्ये पोटावरच जास्त ताण येतो. आसनाच्या अंतिम स्थितीत, हात आणि पाय वर गेल्यावर शरीर नावेच्या आकारासारखे दिसते.

3/8

पश्चिमोत्तानासन (Paschimottanasana)

Yoga Asanas To Reduce Belly Fat

संपूर्ण शरीराचे वजन कमी करण्यासाठी आसनात तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. या आसनात पायाच्या टाचेपासून डोक्यापर्यंत, शरीराचा पाठीकडील भाग ताणला जातो. यामुळे पाठीकडील बाजूचे स्नायू आणि पाठीचा कणा दोघांना चांगला ताण मिळतो. गुडघ्यामागील स्नायू आणि कमरेचे स्नायू अधिक लवचिक होतात आणि विशेषत: ओटी पोटावर दाब आल्यानं त्यावरील चरबी कमी होते.  

4/8

धनुरासन (Dhanurasana)

Yoga Asanas To Reduce Belly Fat

पोट आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हे आसन सर्वोत्तम उपाय आहे. धनुरासनाची अंतिम स्थिती धनुष्याच्या आकारासारखी आहे. म्हणूनच याला योगासनला धनुरासन म्हणतात.

5/8

भुजंगासन (Bhujangasana)

Yoga Asanas To Reduce Belly Fat

या आसनामुळे पाठीच्या कण्याच्या लवचिकता वाढतो. पोटाच्या स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि अपचनाची समस्या कमी होते. महत्त्वाचे म्हणजे, पोट आणि कमरेवरील चरबी कमी होईल.  

6/8

पवनमुक्तासन (Pawanmuktasana)

Yoga Asanas To Reduce Belly Fat

या आसनामुळे गॅसेसची समस्या कमी होते आणि पोटाचे आरोग्य सुधारते. या आसनामुळे पोटात ताण येतो आणि पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत होते आणि पोटाची वाढलेली चरबीही कमी होते.

7/8

हस्तपादासन (Hastapadasana)

Yoga Asanas To Reduce Belly Fat

हे आसन करताना कंबर आणि पोटात जास्त ताण येतो. कंबर आणि पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

8/8

ताडासन (Tadasana)

Yoga Asanas To Reduce Belly Fat

ताडासनामुळे संपूर्ण शरीर ताणले जाते आणि शरीराला ऊर्जाही मिळते. तसेच संपूर्ण शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो. या आसनाच्या शेवटच्या स्थितीत शरीराला ताण देऊन टाचा उंच करून पायांच्या बोटांवर उभे राहावे लागते. या आसनामुळे संपूर्ण शरीराचा ताण मिळाल्याने पोटाची आणि कमरेवरील चरबी कमी होण्यास मदत होते.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)