International Yoga Day 2023 : शरीराच्या Sexual Functions पासून प्रजनन क्षमतेपर्यंत, मोठी मदत करतात 'ही' आसनं

International Yoga Day 2023 : अशा या योगसाधनेमुळं अनेक व्याधींपासूनही मुक्तता मिळवणं सहज शक्य होतं. सोबतच शारीरिक अडचणींवर सकारात्मकरित्या उपायही करता येतो. प्रजनन क्षमतेसाठीसुद्धा अनेक जोडप्यांकडून योगसाधनेला प्राधान्य दिलं जातं. 

Jun 21, 2023, 09:06 AM IST

International Yoga Day 2023 : आरोग्यदायी शरीर आणि मन यांच्यासाठी एका साचेबद्ध मार्गानं प्रयत्न करणं म्हणजेच योगाभ्यास करणं. संपूर्ण जगाला अनोखं देणं देणाख्या या योगविद्येचे कैक फायदे आपण पाहिले, वाचले आणि ऐकले. 

1/8

How to enhance fertility through Yoga

 International Yoga Day 2023  asanas to Enhance fertility through Yoga

How to enhance fertility through Yoga : वैद्यकिय क्षेत्राची मदत घेण्यासोबतच अशी काही आसनं आहेत ज्यामुळं प्रजनन क्षमता वाढते. तणाव कमी होतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलतो  

2/8

सूर्यनमस्कार

 International Yoga Day 2023  asanas to Enhance fertility through Yoga

सूर्यनमस्कार हे त्यातलंच एक. यामुळं sexual functions मध्ये सुधारणा होते. शिवाय  महिलांच्या गर्भपिशवीवरही याचे सकात्मक परिणाम होतात. 

3/8

भ्रमरी प्राणायाम

 International Yoga Day 2023  asanas to Enhance fertility through Yoga

भ्रमरी प्राणायामामुळं तणाव आणि नैराश्य कमी होतं. प्रजनन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या या घटकावर काम केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

4/8

पश्चिमोत्तासन

 International Yoga Day 2023  asanas to Enhance fertility through Yoga

कमरेखाली असणाऱ्या स्नायूंना या आसनामुळं ताण मिळतो. ज्यामुळं महिलांना सर्वाधिक फायदा होऊन त्यांच्या गर्भधारणेतील अडचणी दूर होतात. तणाव कमी होतो.   

5/8

हस्तपादासन

 International Yoga Day 2023  asanas to Enhance fertility through Yoga

हस्तपादासनामुळं शरीर लवचीक होतं. ज्यामुळं ओटीपोटावर येणारा ताणही कमी होतो.   

6/8

जानू शिर्षासन

 International Yoga Day 2023  asanas to Enhance fertility through Yoga

गर्भधारणेत उशिर होत असल्यास हे आसन बरीच मदत करतं. शिवाय गरोदर महिलांसाठीही हे आसन फायद्याचं. पुरुषांना या आसनामुळं शरीरातील स्नायूंना लवचिक करण्यास मदत होते. 

7/8

बद्धकोषासन

 International Yoga Day 2023  asanas to Enhance fertility through Yoga

पुरुष आणि महिलांमध्ये या आसनाचे अनेक फायदे. या आसनामुळं कमरेच्या मागील भाग, गुडघे आणि मांड्यांच्या आतील भागाला आराम मिळतो. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही हे आसन मदत करतं. 

8/8

बालासन

 International Yoga Day 2023  asanas to Enhance fertility through Yoga

बालासनामुळं तणाव कमी होण्यासोबतच शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होतो. या आसनामुळं पाठ, कणा, गुडघे, मांड्यांचे स्नायू मोकळे होतात.