साडी ड्राय क्लीन करणं परवडत नाही? मशीनमध्ये कपडाही खराब होतो; तर, या पद्धतीने घरीच धुवा महागड्या साड्या

| Oct 05, 2024, 14:34 PM IST

साडी ड्राय क्लीन करणं परवडत नाही? मशीनमध्ये कपडाही खराब होतो; तर, या पद्धतीने घरीच धुवा महागड्या साड्या

1/7

simple hacks in marathi how to wash silk sarees at home simple trick

साडी नेसायला महिलांना खूप आवडते. साडीचा ट्रेंड हा कधीच जुना होऊ शकत नाही. साडी नेसून झाल्यानंतर मात्र महिलांना टेन्शन येते ते मात्र साडी पुन्हा पहिल्यासारखी चमकदार कशी ठेवायची. अशावेळी महिला रोल प्रेससाठी साडी देतात. मात्र प्रत्येकवेळी साडी रोलप्रेसला देणे परवडत नाही. अशावेळी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. 

2/7

simple hacks in marathi how to wash silk sarees at home simple trick

सिल्कच्या साड्या या खूप महाग असतात. सिल्क साडी एकदा नेसली की ती चार ते पाच वेळा नेसा आणि नंतरच धुवायला काढा. मात्र,  साडी धुण्याआधी त्यावरील लेबल वाचा. अनेकदा डिटर्जंटने धुतल्यास साडी खराब होऊ शकते. 

3/7

simple hacks in marathi how to wash silk sarees at home simple trick

रेशमी व महागड्या साड्या धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळा. साडी धुण्यासाठी थंड पाणीच वापरावे. साडी काही काळ थंड पाण्यात भिजत ठेवा. गरम पाण्यात साडी धुतल्याने तिचा रंग फिका पडू शकतो.

4/7

simple hacks in marathi how to wash silk sarees at home simple trick

साडी धुण्यासाठी हार्ड डिटर्जंट वापरु नका. साडी भिजत घातल्यानंतर त्यात शॅम्पू टाकावा. शक्यतो साडी खालच्या काठाच्या बाजूनेच जास्त मळलेली असते. अशावेळी साडीचे काठच हाताने चोळून घ्या. नंतर पुन्हा एकदा थंड पाण्याने साडी स्वच्छ धुवून घ्यावी.

5/7

simple hacks in marathi how to wash silk sarees at home simple trick

साडीवर डाग पडले असतील तर एका मोठ्या बादलीत व्हाइट व्हिनेगर दोन चमचे टाका. आता जिथे साडीवर डाग आहे. तिथे हातानेच चोळून घ्या. साडीला कुठेही अजिबात ब्रशचा वापर करु नका. 

6/7

simple hacks in marathi how to wash silk sarees at home simple trick

साडी धुवून झाल्यावर कधीही ती जोरजोरात पिळून काढू नका. त्यामुळं साडीचा पोत खराब होते. 

7/7

simple hacks in marathi how to wash silk sarees at home simple trick

 साडी कधीही कडक उन्हात वाळत घालू नका. त्यामुळं साडीचा रंग फिका पडू शकतो.