दोघांत तिसरा! ...तर समजून जा तुमचा जोडीदार Emotional Support साठी 'तिसऱ्या'वर अवलंबून

Married Relationship : प्रत्येक वेळी शारीरिक आकर्षण हाच विवाहबाह्य संबंधांमागचा हेतू नसतो. तर, हल्लीच्या दिवसांमध्ये भावनिक आणि मानसकि आधार या गोष्टींमुळंही व्यक्ती कोणा नव्या व्यक्तीचा शोध घेतात. किंवा एका नव्या नात्याला प्राधान्य दिसतात. त्यामुळं नात्यात जेव्हा पती किंवा पत्नींमध्ये काही ठराविक बदल दिसून येतात तेव्हा त्यांचं मन दुसरीकडेच गुंतल्याची बाब जवळपास खरी असू शकते हे नाकारता येत नाही. 

Jun 06, 2023, 11:44 AM IST

Married Relationship : एखाद्या नात्याची जेव्हा सुरुवात होते, तेव्हातेव्हा त्या नात्यांचा पाया असतो भावना आणि एकमेकांवर असणारा विश्वास. पण,  प्रत्येकवेळी नात्यांचा, एखाद्या लग्नाचा हा पाया भक्कम राहिलच असं नाही. अनेकदा जोडीदार नकळत एका नात्यापासून दुरावतो आणि एका नव्या नात्यात त्याला किंवा तिला जास्त रमावसं वाटू लागतं. 

1/7

दोघांत तिसरा!

signs of your marriage is in trouble in terms of emotional relationship

दोघांत तिसरा! ...तर  समजून जा तुमचा जोडीदार Emotional Support साठी 'तिसऱ्या'वर अवलंबून

2/7

गोपनीयता...

signs of your marriage is in trouble in terms of emotional relationship

एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या पती किंवा पत्नीपासून दुसऱ्या एखाद्या पत्नीसोबतचं नातं किंवा एखादा प्रसंग लपवत असेल तर समजा इथे नात्यातील भावनिक बंध काहीसे नाजूक झाले आहेत. 

3/7

भावनिक नातं

signs of your marriage is in trouble in terms of emotional relationship

एखाद्या नात्यात वचनबद्ध असतानाही भावनिक आधारासाठी बाहेरील एखाद्या व्यक्तीचा आधार ही बाब वैवाहिक नात्यासाठी धोकादायक ठरते. आपल्या जोडीदाराला जे सांगणं अपेक्षित असतं ते जेव्हा सहजपणे आणि तितक्याच हक्कानं एखाद्या व्यक्तीला सांगितलं जातं तेव्हा भावनिक नात्यात दुरावा आलेला असतो.   

4/7

समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असणं

signs of your marriage is in trouble in terms of emotional relationship

जोडीदारापेक्षाही जास्त महत्त्वं तुम्ही एखाद्या व्यक्तीला देताय, त्यांच्याशी नुसता संवाद साधणंही तुम्हाला आनंद देणारं ठरत असेल तर असं समजा की तुम्ही एका 'Emotional Affair'मध्ये आहात.   

5/7

प्रमाणापेक्षा जास्त बोलणं...

signs of your marriage is in trouble in terms of emotional relationship

खासगी मेसेज, फोन किंवा इतर कोणत्याही मार्गानं तुम्ही तुमच्या जोडीदाराऐवजी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीशी अधिकाधिक वेळ संवाद साधत असाल तर, तुम्ही भावनिक मार्गानं त्यांच्यासोबत एका नात्याता आहात हे लक्षात घ्या. तुमच्या जोडीदाराच्या बाबतीतही असं घडू शकतं.   

6/7

जोडीदारापासूनच दुरावा

signs of your marriage is in trouble in terms of emotional relationship

Emotional Affair मध्ये असणारी व्यक्ती एका टप्प्यानंतर लहानसहान गोष्टींसाठीसुद्धा तिसऱ्याच व्यक्तीला प्राधान्य देते आणि तेव्हा वैवाहिक नात्यात आलेलाय दुरावा स्पष्टपणे जाणवू शकतो. त्यामुळं असं जाणवल्यास जोडीदाराशी संवाद साधा.     

7/7

काहीसा संकोच...

signs of your marriage is in trouble in terms of emotional relationship

तिसऱ्याच व्यक्तीशी तुमचा वाढलेला संवाद पाहता त्यानंतर जेव्हा जुमच्या जोडीदाराकडून त्याबाबतचे प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा जर तुमच्या चेहऱ्यावर शरमेची छटा असेल तर समजा की तुम्ही Emotional Affair मध्ये आहात.