Janmashtami Wishes 2023: गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या मराठीतून शुभेच्छा देत साजरा करा यंदाचा कृष्णा जन्मोत्सव

Krishna Janmashtami  And Dahi Handi Wishes in Marathi : भगवान श्रीकृष्णजन्माष्टमी आज घरोघरी साजरा करण्यात येणार आहे. तर गुरुवारी 7 सप्टेंबरला दहीहंडीचा उत्साह असणार आहे. 

Sep 06, 2023, 16:04 PM IST

Krishna Janmashtami Wishes in Marathi : श्रीकृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त नातेवाईक आणि मित्रांना खास मराठीतून शुभेच्छा द्या.  (Happy Janmashtami 2023 Wishes Messages)

1/12

कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतश: प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

2/12

गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास यशोदा, देवकी ज्याची मैय्या तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

3/12

दह्यात साखर आणि, साखरेत भात, दही हंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावूनच उंच थर, जोशात करूया दही हंडीचा थाट… कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

4/12

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमी चा दिवस खास. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

5/12

चंदनाचा सुवास,फुलांची बरसात, दह्याची हंडी आणि पावसाची बरसात, लोणी चोरायला आला माखनलाल, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

6/12

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास असा आहे आजचा दिवस खास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा

7/12

हे आला रे आला गोविंदा आला… गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा… दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…

8/12

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग, मात्र अतिउत्साहात नका करू नियमभंग.. सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

9/12

 तो येतो दंगा करतो हातात घेऊन बासरी कपाळावर आहे मोरपीस चोरून घेतो लोण्याचा गोळा फोडून दही हंडी करतो धमाल असा आहे नटखट नंद किशोर

10/12

विसरुनी सारे मतभेद लोभ- अहंकार सोडा रे सर्वधर्मसमभाव जागवून आपुलकीची दहीहंडी फोडा रे, दहीहंडीच्या शुभेच्छा!

11/12

थरावर थर रचून झाले मित्र सज्ज मटकी फोडू, खाऊ लोणी गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा"

12/12

 पावसाची सर राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर साजरा करुया गोपालकाल्याचा सण! दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!"