Shravan 2024 : भारताव्यतिरिक्त देखील 'या' देशांत आहे, भगवान शंकरांच्या भव्य मूर्ती

महादेवांच्या मंत्राचा जप जरी केला तरी महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना भोलेनाथ देखील म्हटलं जातं. म्हणूनच  देशात आणि जगभरात शिवभक्तांनी भगवान शंकराच्या विविध ठिकाणी उंच मूर्ती उभारल्या आहेत. 

Aug 07, 2024, 11:42 AM IST

भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच शिवभक्त श्रावणातील सोमवारी महादेवांची उपासना करतात. 

1/9

कैलाशनाथ महादेव, नेपाळ

देवादिदेव महादेव म्हणून भगवान शंकरांची आराधना केली जाते. भारताव्यतिरिक्त इतर आशियाई देशात देखील काही प्रमाणात हिंदू लोक राहतात. काठमांडूमध्ये 144 फूट उंच महादेवांची मूर्ती आहे. कांठमांडूपासून काही अंतरावर असलेल्या या मूर्तीला  कैलाशनाथ महादेव असं म्हणतात. जगातल्या सर्वांत उंच मूर्तींपैकी ही एक आहे. 

2/9

मुरुडेश्वर महादेव, कर्नाटक

भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणटोकापर्यंत महादेवांची ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे दाक्षिणात्य भागातही शिवभक्त मोठ्या प्रमाणात आहेत. कर्नाटकातील गोकर्ण येथील भगवान शिवाचं मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराच्या बाजूला असलेला निळाशार समुद्र आणि मुरुडेश्वराची सर्वात उंच मूर्ती पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटक या ठिकाणाला भेट द्यायला येतात.   

3/9

मंगल महादेव, मॉरिशस

मॉरिशसच्या काही भागात हिंदू धर्मातील देवी देवतांची मंदिरे आहेत. येथील मंगल महादेवाची उंच मूर्ती पाहायला पर्यटक जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात. हातात त्रिशुळधारण केलेल्या मंगल महादेवाची मूर्ती सुमारे 108 फूट उंच आहे.  ग्रँड बेसिन  तलावाजवळ या मूर्तीची उभारणी केली आहे. महादेवाची मूर्ती असल्यामुळे या तलावाला गंगा तलाव असंही म्हणतात. 

4/9

हर की पौरी शिव पुतळा, हरिद्वार

हरिद्वारच्या गंगा घाटावर भोलेनाथांची 100 फूट उंच मूर्ती आहे. हरिद्वार हे महादेवांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. हर की पौरी शिव पुतळा येथील ही मूर्ती भारतातील सर्वांत उंच मूर्ती आहे.   

5/9

आदियोगी शिवमूर्ती, कोईम्बतूर

कोईम्बतूरच्या वेल्लियांगिरी पर्वतावर स्थित आहे. असं सांगितलं जातं की, सुमारे 500 टन स्टीलचा वापर करुन ही भव्य मूर्ती साकारली आहे. 34.3 मीटर उंच, 45 मीटर लांबी असलेल्या या मुर्तीची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. 2017 मध्ये सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी या मूर्तीला 'आदियोगी' असं नाव दिलं. महादेव हे वैरागी होते, तपस्वी होते. शिव हा संयम आणि त्यागाचं देखील प्रतिक आहे. ज्याला पाहून मन:शांती मिळते असा हा योगी म्हणजे  'आदियोगी' असं म्हटलं जातं. 

6/9

रामदुर्ग शिवमूर्ती, कर्नाटक

भारताच्या दक्षिण भागात महादेवांची अनेक मंदिरं आहेत. बेळगाव येथे 78 फूट उंच असलेली रामदुर्गमधील शिवाची ही मूर्ती देशातील भव्य मूर्ती म्हणूनही ओळखली जाते. 

7/9

खज्जीयार महादेव पुतळा, डलहौसी

हिमाचलच्या दाटीवाटीत असलेल्या या पुतळ्याची उंच 85 फूट इतकी आहे. हिमालय पर्वाताच्या सान्निध्यात असलेली ही मूर्ती चंबा जिल्ह्यातील डलहौसी  येथे आहे. 

8/9

सर्वेश्वर महादेव, वडोदरा

सोमेश्वर आणि स्तंभेश्वर सारखी महादेवांची तीर्थक्षेत्र गुजरातमध्ये आहेत. त्याशिवाय गुजरातच्या वडोदरा येथील 'सर्वेश्वर महादेव' ही 111 फुटांची मूर्ती आहे. याचं विशेष आकर्षण म्हणजे साधरण 17 किलो सोन्याची ही मूर्ती असून तीच्या रचनेसाठी तब्बल  12 कोटी रुपये खर्च करण्यात आले.   

9/9

नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारका

बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे स्थान म्हणून नागेश्वर ज्योतिर्लिंग ओळखलं जातं. द्वारकेमधील या ठिकाणी असलेली भोलेनाथांची मूर्ती पाहून आत्मिक शांतता मिळते असं येथे येणारे भाविक सांगतात.