पालकांनी मुलांना 'या' चांगल्या सवयी नक्की लावाव्यात

लहान मुलं आपल्या पालकांचं बघून वागतात, बोलतात आणि व्यक्त होतात. लहान मुलांमध्ये निरीक्षण शक्ती जास्त असते त्यामुळे मोठी माणसं जसं वागतात , बोलतात तेच वागणं लहान मुलं आत्मसात करतात. म्हणूनच लहान मुलांशी संवाद साधताना त्यांच्या समोर काळजीपूर्वक  व्यक्त होणं गरजेचं आहे. 

May 25, 2024, 16:49 PM IST

मुलं पालकांच्या चांगल्या,वाईट सगळ्याच सवयी आत्मसात करतात. जर तुम्हाला वाईट सवयी असतील तर मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडाव्या लागतील. 

 

1/6

लहान मुलं जास्त काळ आई वडील किंवा आजी आजोबांसोबत जास्त असतात. त्यामुळे पालक मुलांसाठी आदर्श व्यक्तीमत्त्व असातात. अशा वेळी मुलांना घडवताना पासकांची भूमिका खूप महत्त्वाची असते.

2/6

संयम ठेवणं

कोणतंही काम करताना खूप वेळ लागतो. त्यावेळी तुमचा संयम फार महत्त्वाचा असतो. पटकन रागावणं, चिडणं किंवा लगेच नाराज होणं, यामुळे  तुमच्या व्यक्तिमत्वावर वाईट  परिणाम होतो. त्यामुळे मुलांना कोणत्याही परिस्थितीत संयमाने रहायला शिकवणं महत्त्त्वाचं आहे.   

3/6

मदतशील असणं

एकमेकांना अडीअडचणीत मदत करणं, आपला मित्र किंवा समाजातील इतर घटकांशी आपलं नातं आहे. याची त्यांना जाणिव करुन देणं गरजेचे आहे. यामुळे मुलांमध्ये एकमेकांविषयी प्रेम आणि मैत्रीचं नातं तयार होतं. 

4/6

आपलं मतं मांडणं

बऱ्याचदा पालक सांगतील तीच पूर्व दिशा असं होताना दिसतं. त्यामुळे मुलांना काय वाटतं ते त्यांना पालकांपर्यंत पोहोचवता येत नाही. आपल्या समोर कोणी ही कितीही मोठी व्यक्ती असो 'नाही' ला नाही म्हणण्याची हिंमत करणं ही सवय मुलांना चांगला माणूस बनण्यास मदत करतं. 

5/6

जबाबदारीची जाणीव करुन देणं

घरच्या गोष्टी आणि परिस्थिती याची मुलांना जाणीव करुन दिली की, ते हट्ट करत नाही. पालक जर ईमानदारीने वागत असतील तर तेच मुलं अनुकरण करतात. त्यामुळे मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी तुम्ही माणूस म्हणून चांगलं वागणं गरजेचं आहे.   

6/6

स्पर्श ओळखणं

दिवसेंदिवस लहान मुलांचं लैंगिक शोषण होत असल्याचं प्रमाण  वाढत आहे. त्यामुळे गुड टच बॅड टच याबाबत मुलांशी पालकांनी मोकळपणाने बोलणं महत्त्वाचं आहे.