PHOTO : डॉक्टर व्हावी अशी आईची इच्छा, पण ती झाली अभिनेत्री; आज आहे करोडोंच्या मालमत्तेची मालकीण, श्रीदेवीशी आहे कनेक्शन

Entertainment : या चिमुकलीच्या जन्मावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आई वडील बॉलिवूडमधील नावाजलेले लोक. आई तर मेगास्टार आणि सौंदर्याची खजिना. असं असतानाही लेक डॉक्टर व्हावी अशी इच्छा असतानाही ती अभिनेत्री झाली. 

Mar 06, 2024, 09:38 AM IST
1/7

स्टार किड्सपैकी एक अशी ही अभिनेत्रीने कलाविश्वास आपल्या मेहनतीच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली. या फोटोमध्ये दिसणाऱ्या दोन्ही चिमुकल्यांचा संबंध श्रीदेवी यांच्याशी आहे. 

2/7

या आहेत जान्हवी आणि खुशी कपूर. जान्हवी कपूर हिचा आज वाढदिवस. त्यामुळे खुशीने त्यांच्या लहानपणीचा क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

3/7

श्रीदेवीला जान्हवी डॉक्टर व्हावी अशी इच्छा होती. पण तिने अभिनयाचा क्षेत्र निवडलं. जान्हवीच्या पहिला चित्रपट धडक रिलीज झाला तेव्हा श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला होता. 

4/7

बोनी कपूर दिग्दर्शक, आई अभिनेत्री, काका अनिल कपूर मेगास्टार तर सोनम कपूर अभिनेत्री...खरं तर अख्ख कपूर कुटुंब बाॉलिवूडमध्ये निगडित आहे. 

5/7

जान्हवी कपूरच्या जन्माची बातमी मिळाली त्यानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लग्न केलं असं काही मीडिया रिपोर्टमध्ये बोललं गेलं आहे. 

6/7

तुम्हाला हा किस्सा माहिती आहे का? तिच्या बेडरुममधील बाथरुमला आजही लॉक नाही. कारण बाथरुमचं दार बंद करुन ती मुलांसोबत बोलेल अशी श्रीदेवीला भीती वाटायची. 

7/7

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आज ही अभिनेत्री स्वतःच करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. रिपोर्ट्सनुसार, जान्हवी 58 कोटींची मालकीण आहे. चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी कपूर जाहिराती, स्टेज परफॉर्मन्स आणि ब्रँड शूटमधूनही भरपूर पैसे कमावतो.