आमदार अपत्रता कारवाईप्रकरणी विधीमंडळात कशी होणार सुनावणी? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

MLAs Disqualification: सुनावणीवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही आपले म्हणणे मांडता येणार आहे. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. 

| Sep 09, 2023, 16:48 PM IST

MLAs Disqualification:विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल ३४ याचिकांवर सुनावणी घेतली जाणार आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर शिवसेनेचे 54 आमदार एकाच छताखाली येणार आहे.

1/9

आमदारांवर अपत्रातेची कारवाई! विधीमंडळात होणाऱ्या सुनावणीबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

Shiv Sena MLAs Disqualification Impeachment hearing News in Marathi

MLAs Disqualification:आमदार अपात्रता प्रकरणी 14 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार असून या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यात सुरूवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या  14 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पूर्ण होईल. दरम्यान ही सुनावणी नेमकी कशी होईल? याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

2/9

मॅरेथॉन सुनावणी

Shiv Sena MLAs Disqualification Impeachment hearing News in Marathi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मॅरेथॉन सुनावणी होणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 14 सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी होणार सर्व आमदारांची सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 14 सप्टेंबर हा दिवस राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरु शकतो, असे म्हटले जात आहे. 

3/9

शिवसेनेचे 54 आमदार एकाच छताखाली

Shiv Sena MLAs Disqualification Impeachment hearing News in Marathi

विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल ३४ याचिकांवर सुनावणी घेतली जाणार आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर शिवसेनेचे 54 आमदार एकाच छताखाली येणार आहे. 

4/9

वादी आणि प्रतिवादी

Shiv Sena MLAs Disqualification Impeachment hearing News in Marathi

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही आपले म्हणणे मांडता येणार आहे. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. 

5/9

वेगळी सुनावणी

Shiv Sena MLAs Disqualification Impeachment hearing News in Marathi

प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार आहे.

6/9

आपलं म्हणणं मांडायला संधी

Shiv Sena MLAs Disqualification Impeachment hearing News in Marathi

विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी आमदाराना आपलं म्हणणं मांडायला संधी दिली जाणार आहे.

7/9

एकमेकांना पुराव्याचे पेपर

Shiv Sena MLAs Disqualification Impeachment hearing News in Marathi

यानंतर आमदार आपले पुरावे सादर करतील तसेच एकमेकांना पुराव्याचे पेपर सुद्धा देतील.

8/9

याचिकेचे वेगळे इशू फ्रेम

Shiv Sena MLAs Disqualification Impeachment hearing News in Marathi

मग विधिमंडळ सर्वाचं म्हणणं ऐकून घेतल्यावर प्रत्येक याचिकेचे वेगळे इशू फ्रेम करण्यात येईल.

9/9

दिवसभर सुनावणी

Shiv Sena MLAs Disqualification Impeachment hearing News in Marathi

विधानभवनात 14 सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार असून गोंधळ, गदारोळ टाळण्यासाठी प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाईल.