PHOTOS: सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचे 'हे' गुण प्रत्येकाने घेतले पाहिजेत

Shiv Jayanti 2024: शौर्य, धैर्य आणि औदार्य... इतिहासाची पाने चाळताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची यशोगाथा समोर येते. रयतेचा राजा अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख. मात्र, महाराज सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरु म्हणूनही ओळखले जातात. शिव जयंती निमित्त शिवाजी महाराज यांचे 'हे' गुण प्रत्येकाने घेतले पाहिजेत.

वनिता कांबळे | Feb 19, 2024, 10:07 AM IST
1/7

दूरदृष्टी

दूरदृष्टी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा गुण आहे. महाराजांनी भविष्याचा विचार करून स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि त्यापद्धतीने नियोजन केले.    

2/7

आरमार आणि प्रशासन

शत्रुंशी लढण्यासाठी महाराजांनी भव्य आरमार उभारले. महाराजांनी राज्यकारभार चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळ तयार केले. करवसुली केली जायची. कर गोळा करण्यासाठी माणसे नियुक्त केली होती. 

3/7

गनिमी कावा

गनिमी कावा हा  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील सर्वेत्तम गुण. शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याला हरवण्यासाठी महाराजांनी गनिमी कावा शोधून काढला होता. शक्तीपेक्षा युक्ती जास्त श्रेष्ठ असते हे महारांजांनी दाखवून दिले. 

4/7

नविन काही तरी शिकण्याची जिद्द

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात सतत काही तरी नविन शिकण्याची जिद्द असायची. यामुळेच ते ते वेळोवेळी विविध प्रकारच्या शस्त्रांबद्दल जाणून घेत असत.  

5/7

टीम लीडर

छत्रपती शिवाजी महाराज उत्तम हे उत्तम  टीम लीडर होते. स्वतःच्या कामातून त्यांनी स्वतःच्या सहकाऱ्यांना आदर्श घालून दिला.   

6/7

नियोजन

नियोजनाच्या जोरावर महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. कोणतीही मोहिम अखताना त्याचे प्लानिंग तसेच पर्यायी नियोजन देखील महाराज करायचे.

7/7

अर्थव्यवस्थापन

छत्रपती शिवाजी महाराज उत्तम आर्थिक व्यवस्थापन करत मोठमोठ्या मोहीम यशस्वी केल्या.