PHOTO : नातवंडांची आजी बनण्याच्या वयात तिने जिंकला मिस युनिव्हर्सचा मुकूट, कोण आहे ही अप्सरा?

Miss Universe Buenos Aires Alejandra Marisa : ऐकावं ते नवलं...तरुण्याला वयाचं बंधन नसतं. म्हणून म्हटलं जातं नाह सौंदर्याला कोणतेही वय नसतं, हेच सिद्ध केलंय 60 वर्षांच्या आजीने. मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा खिताब जिंकून तिने इतिहास रचला आहे. 

May 17, 2024, 13:10 PM IST
1/7

आजी बनण्याचा वयात या महिलेने सर्वांना आश्चर्यचकित केलंय. मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 वर तिने आपलं नाव कोरलंय. या महिलेच नाव आहे. अलेजांड्रा मारिया रॉड्रिग्ज यांच्या सौंदर्यापुढे तरुणींचं सौंदर्य फिकं पडेल. 

2/7

अलेजांड्रा मारिया रॉड्रिग्ज ही प्लाटा इथली रहिवासी असून ती वकील आणि पत्रकार आहे.  18 ते 73 वर्षे वयोगटातील या स्पर्धेत तिने 34 महिलांना मागे टाकत इतिहास रचला आहे. 

3/7

या वयातही तिच्या फॅशन आणि स्टाइलने तिने सर्वांना वेड लावलंय. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही की तिचं वय 60 वर्षांचं आहे. 

4/7

या वयात महिला नातंवंडासोबत वेळ घालवतात मात्र अलेजांड्राने आपल्या ड्रेसिंग सेन्सने धुमाकूळ घातला आहे. 

5/7

त्या इथेच थांबलेल्या नाहीत आता पुढे येणाऱ्या मिस युनिव्हर्स अर्जेंटिनासाठी तयारी करत आहेत. ही स्पर्धा 25 मे 2024 रोजी होणार आहे. 

6/7

अलेजांड्रा मिस युनिव्हर्स अर्जेंटिना स्पर्धा जिंकली तर ती मिस युनिव्हर्स 2024 मध्ये ती अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व करेल. ही स्पर्धा 28 सप्टेंबर 2024 रोजी मेक्सिको होणार आहे. 

7/7

मिस यूनिवर्स ऑर्गनाइजेशन सांगितलं की, यापूर्वी या स्पर्धेसाठी 18 ते 28 अशी वयोमर्यादा होती. पण आता यापुढे 18 वर्षांपासून पुढे कितीही वय असलेल्या महिला सहभागी होऊ शकतात.