Netflix चा पासवर्ड शेअर करणाऱ्यांना बसणार फटका! 600 रुपये एक्स्ट्रा कट होणार

Netflix ने एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा पासवर्ड शेअरिंगसंबंधी आहे. कंपनी आता युजर्सना आपला पासवर्ड शेअर करण्याची परवानगी देणार आहे. पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे.   

May 24, 2023, 18:39 PM IST

Netflix ने एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा पासवर्ड शेअरिंगसंबंधी आहे. कंपनी आता युजर्सना आपला पासवर्ड शेअर करण्याची परवानगी देणार आहे. पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. 

1/9

Netflix ने एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा पासवर्ड शेअरिंगसंबंधी आहे. कंपनी आता युजर्सना आपला पासवर्ड शेअर करण्याची परवानगी देणार आहे. पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे.   

2/9

मंगळवारी नेटफ्लिक्सने घोषणा केली आहे. नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगचा युजर्सवर कसा प्रभाव पडेल याची माहिती त्यांनी दिली आहे.   

3/9

कंपनीने नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगला पेड सर्व्हिसमध्ये रुपांतरित केलं आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचा पासवर्ड कोणासोबत शेअर केला तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतीत.   

4/9

सध्या फक्त अमेरिका आणि युरोपातील देशांमधये ही योजना लागू करण्यात आली आहे. भारतात अशी कोणतीही घोषणा कऱण्यात आलेली नाही. ही योजना भारतात येऊ नये अशीच प्रार्थना युजर्स करत आहेत.   

5/9

OTT प्लॅटफॉर्म्स भारतात आपला युजरबेस वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही योजना भारतात लागू करणार नाही अशी आशा आहे. पण दुसऱ्या ठिकाणी हा प्लान घोषित करण्यात आला आहे.   

6/9

अमेरिकेतील बाजाराबद्दल बोलायचं गेल्यास, Netflix Standard Plan साठी महिन्याला 15.49 डॉलर्स मोजावे लागत आहेत. या प्लानमध्ये तुम्ही आणखी एका सदस्याला जोडू शकता. पण त्यासाठी महिन्याला 7.99 डॉलर म्हणजेच 660 रुपये खर्च करावे लागतील.   

7/9

तर Netflix Premium Plan मध्ये युजर्स दोन सदस्यांना जोडू शकतात. यासाठी युजर्सना प्रत्येक सदस्यामागे महिन्याला 7.99 डॉलर्स खर्च करावे लागतील.   

8/9

अमेरिकेसह युरोपमध्येही कंपनीने ही सेवा सुरु केला आहे. UK मध्ये नेटफ्लिक्स युजर्सना अतिरिक्त सदस्यासाठी 4.99 पाऊंड खर्च करावे लागणार आहेत.   

9/9

अतिरिक्त सदस्याची ही सुविधा बेसिक आणि स्टँडर्ड प्लानमध्ये मिळणार नाही. कंपनी पासवर्ड शेअरिंगवर उपाय करण्यासाठी सतत प्रयत्न करत असून अनेक नवी धोरणं आखत आहे.