'या' Lesbian Couple ची थेट Guinness Record मध्ये नोंद! कारणही आहे फारच रंजक

Lesbian Couple Guinness Records: त्या दोघींनी एकमेकींना 3 वर्ष डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. आता त्यांची दखल थेट गिनीज रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. जगातील उंचीमध्ये सर्वाधिक अंतर असलेलं विवाहित समलैंगिक जोडपं म्हणून गिनीजने त्यांची दखल घेतली आहे. नेमक्या या दोघी आहेत कोण आणि त्यांची लव्हस्टोरी काय आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | May 24, 2023, 18:16 PM IST
1/11

Lesbian Couple Guinness Records

समलैंगिक लग्न ही अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये सर्वसामान्य बाब झाली आहे. सध्या एका समलैंगिक विवाहित जोडप्याची दखल त्यांच्या उंचीमधील अंतरामुळे थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. हे जोडपं अमेरिकेतील आहे. दोघांच्या उंचीमध्ये 3 फुटांचं अंतर आहे. या जोडप्याला आता सर्वच सत्रांमधून लोकांचा पाठिंबा मिळत आहे.

2/11

Lesbian Couple Guinness Records

30 जुलै 2022 रोजी अमेरिकेतील उथा येथील सेंट जॉर्टमधील क्रिस्टी सॅण्डलर आणि सेनेका कोरेस्टी यांच्या नावावर हा अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. 'उंचीमध्ये सर्वाधिक अंतर असलेलं विवाहित जोडपं,' अशी या जोडप्याची नोंद करण्यात आली आहे.

3/11

Lesbian Couple Guinness Records

क्रिस्टीची उंची 5 फूट 11 इंच आहे. तर तिची पत्नी सेनेकाची उंची 3 फूट 2 इंच इतकी आहे. म्हणजेच दोघांमध्ये 2 फूट 9 इंच इतकं उंचीचं अंतर आहे.

4/11

Lesbian Couple Guinness Records

सेनेकाला डायस्ट्रोफिक डिसप्लेसिया (Diastrophic Dysplasia) या व्याधीने ग्रस्त आहे. त्यामुळेच तिच्या हाडांचा आणि सांध्याचा विकास झाला नाही.

5/11

Lesbian Couple Guinness Records

सेनेका आणि क्रिस्टी या दोघीही त्यांच्या नावावर विक्रम नोंदवण्यात आल्याने फार एक्सायटेड आहेत. आपला समावेश गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे यावर अजूनही या दोघींचा विश्वास बसत नाहीय.

6/11

Lesbian Couple Guinness Records

"याबद्दल आम्ही पूर्वी बोललो होतो. उंचीत सर्वाधिक अंतर असलेलं कपल आपण ठरु अशी मी पैंजही लावली होती," असं सेनेकाने उंचीमधील अंतरासंदर्भात बोलताना सांगितलं. आपण हे असं मस्करीत बोललो होतो. मात्र खरोखरच या गोष्टीमुळे आमचा थेट गिनीज रेकॉर्ड समावेश होईल असं वाटलं नव्हतं असंही सेनेकाने प्रांजळपणे सांगितलं.

7/11

Lesbian Couple Guinness Records

क्रिस्टी आणि सेनेका एकमेकांनी एकाच शाळेत असल्याने ओळखतात. क्रिस्टी ही विद्यार्थीनी होती तर सेनेका ही गणिताची शिक्षिका होती. सेनेका फारच मनमोकळ्या स्वभावाची असल्याने आमची लगेच मैत्री झाली असं क्रिस्टीने सांगितलं.

8/11

Lesbian Couple Guinness Records

सेनेका या ठिकाणी नव्याने कामावर रुजू झालेली. त्यामुळे क्रिस्टीने तिला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. क्रिस्टीने सर्वांबरोबर ओळख करुन देण्यासाठी सेनेकाची मदत केली. या दोघी फिरायलाही जायच्या.

9/11

Lesbian Couple Guinness Records

या दोघांनी 3 वर्ष एकमेकींना डेट केलं. त्यानंतर जून 2021 मध्ये त्या विवाहबंधनात अडकल्या. दोघींच्या उंचीत फरक असला तरी आर्ट, स्पोर्ट्स आणि शिक्षण क्षेत्रातील दोघींच्या आवडीनिवडी सारख्याच आहेत.

10/11

Lesbian Couple Guinness Records

उंचीमध्ये फरक असल्याने काही अडचणींचा नक्कीच सामना करावा लागल्याचं क्रिस्टी आणि सेनेका सांगतात. मात्र यामुळे आम्हा दोघींमधील प्रेम कमी झालं नाही यावर दोघींचं एकमत आहे.  

11/11

Lesbian Couple Guinness Records

कोणतीही शारीरिक व्यंग असेल तर त्या व्यक्तीने एखाद्याजवळ मनमोकळेपणे बोललं पाहिजे. यामुळे आपल्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे त्या व्यक्तीला इतरांना सांगता येतं. यामुळे नातं घट्ट होण्यास मदत होते, असं सेनेका सांगते. (सर्व फोटो: Guinness World Records वरुन साभार)