टेलरचा मुलगा ते बॉलिवूडचा व्हिलन, 'या' स्टार अभिनेत्याला ओळखलंत का?

मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. कित्येक जण आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या मायानगरीत येतात. या सगळ्याला बॉलिवूडचे स्टार ही याला अपवाद नाही.   

Feb 14, 2024, 12:40 PM IST
1/7

बॉलिवूडचा व्हिलन म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शक्ती कपूरचे वडील दिल्लीत टेलर होते. त्यामुळे आपला मुलगा चांगला टेलर व्हावा असं त्यांना  वाटत होतं.  

2/7

शक्ती कपूरचं खरं नाव सुनील सुंदरलाल कपूर असं आहे. मात्र बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वत:ची ओळख शक्ती कपूर म्हणून केली. 

3/7

शक्ती कपूरच्या वडीलांना आपल्या मुलगा फिल्म इंडस्ट्रीत येऊ नये असं वाटायचं. मात्र शक्ती कपूरला कायमच सिनेसृष्टी खुणावत राहिली.     

4/7

असं म्हटलं जातं की,  इंसानियत का दुश्मन या सिनेमात शक्ती कपूरने साकारलेल्या व्हिलनची भूमिका पाहून त्यांची आई नाराज झाली. 

5/7

शक्ती कपूर आणि कादर खान यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. या जोडीने बॉलिवूडचे अनेक सुपरहिट सिनेमांचा रेकॉर्ड केला आहे.   

6/7

शक्ती कपूरला महाष्ट्राचा जावई म्हटलं जातं. अभिनेत्री  पद्मिनी कोल्हापुरेंची बहिण शिवांगी कोल्हापुरेशी शक्तीने प्रेमविवाह केला. 

7/7

खलनायकाच्या साकारलेल्या भूमिकेमुळे  शक्ती कपूरने बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांची मुलगी श्रद्धा कपूर देखील सध्या बॉलिवूड गाजवत आहे.