'या' देशाचे नागरिक टॅक्सच भरत नाहीत! मग कशी चालते अर्थव्यवस्था? जाणून घ्या
Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.
Citizens not Pay Taxes:जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदारांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियात वैयक्तिक कर आकारत नाहीत. परंतु नागरिकांना सामाजिक सुरक्षा लाभांमध्ये योगदान देणे आवश्यक असते.कतारमध्ये विशिष्ट देशांतील प्रवासींवर त्यांच्या संबंधित सरकारांच्या कर कायद्यानुसार कर आकारला जातो.