Sankashti Chaturthi Wishes in Marathi: संकष्टी चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस

Gajanana Sankashti Chaturthi 2024 Wishes Quotes Whatsapp Status in Marathi : चतुर्थी तिथी भगवान शंकराचा पुत्र गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा केली जाते. आषाढ कृष्ण पक्षातील चतुर्थीला 24 जुलै बुधवारीला गजानना संकष्टी चतुर्थीचं व्रत ठेवण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रियजनांना आणि What's app स्टेटसला ठेवण्यासाठी या शुभेच्छा कामी येतील. 

नेहा चौधरी | Jul 24, 2024, 09:57 AM IST
1/7

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम 

2/7

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो, नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

3/7

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर.. आज संकष्ट चतुर्थी…. सर्व गणेशभक्तांना, संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा…

4/7

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी… सर्व गणेशभक्तांना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

5/7

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

6/7

मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी…

7/7

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!