Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवासाला काय खावे-काय टाळावे? आरोग्यावर होतो परिणाम

Fasting Tips : संकष्टी चतुर्थी आज 26 मे रोजी आहे. या दिवशी गणरायाची मनोभावे पूजा करुन उपवास केला जातो. या उपवासाला काय खावं काय टाळावं हे समजून घ्या. 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणरायाची मनोभावे पूजा केली जात आहे. ज्येष्ठ माहच्या कृष्ण पक्षाला चतुर्थी तिथीवर गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. शुभ कार्याची सुरुवात गणरायाला फुल अर्पण करुन केली जाते. असे म्हटले जाते की, या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि संकटे दूर होतात. म्हणून श्रीगणेशाला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते. 

1/8

संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi 2024

चतुर्थी तिथी 26 मे रोजी म्हणजेच आज संध्याकाळी 6:06 वाजता सुरू होईल आणि 27 मे रोजी 4:53 वाजता चतुर्थी तिथी समाप्त होईल. आज संकष्टी चतुर्थीवर चंद्रोदय रात्री 10 वाजून 12 मिनिटे असणार आहे. 

2/8

उपवास ठेवला जातो

Sankashti Chaturthi 2024

अशावेळी अनेकजण संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात. अशावेळी शरीरात ऊर्जेची नितांत गरज असते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवासा काय खावे हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण यावेळी उपवासात काय खाऊ नये असा देखील विचार पडतो. तज्ज्ञांकडून जाणून घ्या संकष्टीच्या उपवासाला काय खावे आणि काय टाळावे. 

3/8

फळ आणि ज्यूसचे सेवन

Sankashti Chaturthi 2024

उपवासाच्या दिवसांत शरीराला पोषण मिळणे आवश्यक असते. यामध्ये व्हिटॅमिन, खनिजतत्त्वे, फायबर आणि अँटीऑक्सिडेंट उपलब्ध असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच ताज्या आणि सिझनल फळांचे सेवन केल्याने शरीरालाच फायदा होतो.   

4/8

सुकामेवा

Sankashti Chaturthi 2024

उपवासाच्या दिवसांमध्ये अनेकजण कमी आहार घेतात. अशावेळी तुम्ही ड्रायफ्रुट्स खाल्लात तर तुम्हा उर्जा मिळू शकते. यामध्ये बदाम, काजू, खजूर यांचा समावेश करणे आवश्यक आहे. शरीराला थोडी भूक लागल्यास सुकामेव्याचा डबा जवळ ठेवू शकता. यामुळे अँटीऑक्सिडेंट शरीराला मुबलक प्रमाणात मिळते. तसेच यामुळे पोटही भरलेले राहते. 

5/8

भरपूर पाणी प्या

Sankashti Chaturthi 2024

उपवासाच्या दिवसांमध्ये पोटात कमी आहार गेल्यामुळे पाणी देखील कमी प्यायले जाते. अशावेळी गरमी आणि कमी पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. शरीर आतून थकतं, अशक्तपणा जाणवतो. म्हणून उपवासाच्या दिवशी भरपूर पाणी प्या.   

6/8

या पदार्थांमधून मिळेल एनर्जी

Sankashti Chaturthi 2024

उपवास असला की, अनेकजण उपवासाचे पदार्थ खातात. शरीरात प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी सिघांड्याच्या पुऱ्या, पनीरची भाजी असं खाऊ शकता. तसेच बटाट्याची भाजी, साबुदाणा खिचडी यांचा देखील समावेश करु शकता. 

7/8

उपाशी राहू नका

Sankashti Chaturthi 2024

अनेकजण संकष्टी चतुर्थीचा उपवास निर्जली करतात. जसे की, काहीच न खाता पिता हा उपवास केला जातो. पण असे करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचा विचार करा. उन्हाच्या दिवसांमध्ये असा निर्जली उपवास करणे शरीरासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे उपाशी राहणं टाळा. 

8/8

या गोष्टी टाळा

Sankashti Chaturthi 2024

उपवासात अनेकदा उपाशी राहिल्याने पोटात पित्त तयार होते. यामुळे डोकं देखील दुखतं. अशावेळी उपाशी राहू नका तसेच शेंगदाणे किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा. तसेच कांदा, लसूण, फणस, गाजर यासारखे पदार्थ खाणे टाळा.