बॉयफ्रेंडच्या निधनानंतर संजूबाबाची मुलगी सोशल मीडियावर सक्रीय
त्रिशाला कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.
मुंबई : अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर यांच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आणखी स्टार किड्स आपला डेब्यू करण्याच्या मार्गावर आहेत. अभिनेता संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्त देखील अभिनय क्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाली आहे. त्रिशाला कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे अनेक फोटो फार कमी वेळात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बॉयफ्रेंडच्या निधनानंतर ती पुन्हा सोशल मीडियावर पूर्वी प्रमाणे सक्रीय झाली आहे. त्रिशाला सध्या आपले संपूर्ण लक्ष फॅशन डिझाइनींगकडे देत आहे. आपल्या मुलीने अभिनय क्षेत्रात काम करावे अशी संजय दत्तची इच्छा आहे.
1/5
बॉलिवूड बद्दल काय म्हणतो संजय दत्त
2/5