समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI 'असे' करणार काम, जाणून घ्या
Intelligent Transportation System: समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात येत असून ठराविक अंतरावर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नियंत्रण कक्षाकडून कॅमेऱ्यांकडून मिळालेले फुटेज तपासण्यात येणार आहे.
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाईल. MSRDC कडून संपूर्ण 701 किमी लांबीच्या महामार्गावर इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम (ITS) बसविण्यात येणार असून यासाठी कंपनीचा शोध सुरू केला आहे.