Samantha Ruth Prabhu: चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर समांथाचा नवा फोटो समोर...

Samantha Ruth Prabhu Viral Photo: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समांथा ही विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर लगेच समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. समांथानं तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी हा ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान, समांथा आता काय करते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती आता काय करत याविषयी तिनंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 

| Jul 20, 2023, 18:35 PM IST
1/7

यंदाच्या वर्षीचा अखेरचा चित्रपट

खुशी हा समांथाचा यंदाच्या वर्षीचा अखेरचा चित्रपट असणार आहे. 

2/7

आधात्यमच्या प्रवासावर

Samantha Ruth Prabhu, isha foundation,

समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतल्यानंतर ईशा योग केंद्रात दिसली.

3/7

समांथाच्या लूकनं वेधलं लक्ष

Samantha Ruth Prabhu, isha foundation,

समांथा इथे योग किंवा मेडिटेशन करायला गेली असताना देखील तिच्या कपड्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. समांथानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

4/7

फोटो शेअर करत समांथा म्हणाली...

Samantha Ruth Prabhu, isha foundation,

काही वेळ आधी, शांत बसले... कोणताही विचार डोक्यात नसताना, कसलीच चिंता नाही, चुनचुन नाही,  जे अशक्य वाटतं होतं. पण आज ध्यान करतानाची जी वेळ असते त्यात सगळ्यात जास्त ताकद असते... शांती असते आणि शाश्वती असते... सगळ्यात सोप सगळ्यात कठीण असेल असं कोणाला वाटलं होतं.   

5/7

मोर नाचतानाचा करतानाचा व्हिडीओ

Samantha Ruth Prabhu, isha foundation,

समांथानं मोराचा नाचतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

6/7

समांथा विजय देवरकोंडासोबत दिसणार चित्रपटात

Samantha Ruth Prabhu, isha foundation,

समांथा ही विजय देवरकोंडासोबत खुशी या चित्रपटात दिसणार आहे. 

7/7

समांथाला झाला होता 'हा' आजार

Samantha Ruth Prabhu, isha foundation,

समांथाला मायोसिटिस या भयानक आजाराचे निदान झाले होते. (All Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)