गुरु ग्रहाच्या चंद्रावर सापडले मीठ; जीवन अस्तित्वात असल्याचे सबळ पुरावे

यूएस स्पेस एजन्सी नासाच्या जूनो मिशन संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.  गुरु ग्रहाच्या चंद्रावर मीठ सदृष्य पदार्थ सापडले आहेत. गुरु ग्रहाच्या चंद्रावर जीवन अस्तित्वात असल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत. 

Oct 31, 2023, 22:42 PM IST

NASA Juno mission : यूएस स्पेस एजन्सी नासाच्या जूनो मिशन संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.  गुरु ग्रहाच्या चंद्रावर मीठ सदृष्य पदार्थ सापडले आहेत. गुरु ग्रहाच्या चंद्रावर जीवन अस्तित्वात असल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत. 

1/7

नासाच्या जूनो मिशन मोहिमेअंतर्गत गुरूच्या चंद्राच्या गॅनिमेडच्या पृष्ठभागावर खनिज क्षार आणि सेंद्रिय पदार्थ आढळले आहेत. 

2/7

गुरु ग्रहावर रंगीबेरंगी पट्टे आहेत. वायूंचे थर आहेत. या ग्रहावर जो रेडस्पॉट आहे, ते इथं शेकडो वर्षांपासून सुरु असलेलं वादळ आहे, हे वादळ इतकं मोठं आहे. 

3/7

सौरमंडळातला सर्वात मोठा ग्रह. हा ग्रह इतका मोठा आहे की याच्यात शेकडो पृथ्वी सामावू शकतात.

4/7

गुरु ग्रहाच्या चंद्रावरील पृष्ठभागावर हायड्रेटेड सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट आढळून आले आहे. 

5/7

7 जून 2021 रोजी, जुनोने गॅनिमेडवरून किमान 650 मैल (1,046 किलोमीटर) उंचीवर उड्डाण केले.

6/7

NASA च्या गॅलिलिओ स्पेसक्राफ्ट आणि हबल स्पेस टेलीस्कोप युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीने निरीक्षण केले आहे. 

7/7

गॅनिमेड हा गुरूच्या चंद्रांपैकी सर्वात मोठा चंद्र आहे. जो बुध ग्रहापेक्षा मोठा आहे.