शाळेत असताना 100 किलो पेक्षा जास्त वजन! सलमान खानच्या 'या' अभिनेत्रीला व्हायचं होतं कार्डिअ‍ॅक सर्जन

बॉलिवूडच्या भाईजानसोबत अर्थात सलमान खानच्या चित्रपटातून आजवर अनेक अभिनेत्रींनी त्यांचं फिल्मी करिअर सुरु केलं आहे. त्यातही अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी कधीच अभिनय क्षेत्रात येण्याचा विचारही केला नव्हता. त्यापैकी एका अभिनेत्रीविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. 

| Aug 01, 2024, 17:04 PM IST
1/7

शाळेत असताना या अभिनेत्रीचं वजन हे 100 किलो पेक्षा जास्त होतो. तर सलमानशी भेट झाल्यानंतर तिचं आयुष्य बदललं. याविषयी त्या अभिनेत्रीनं कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. 

2/7

ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून झरीन खान आहे. झरीन खाननं शो दरम्यान, स्कूल-कॉलेजच्या काळातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी तिनं लठ्ठत्व आणि तिच्या वेट लॉसच्या जर्नीविषयी सांगितलं आहे. झरीन खाननं सांगितलं की तिचं अभिनय क्षेत्रात येण्याचा कोणताही विचार नव्हता आणि तिला वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचं होतं. 

3/7

शोबिज इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच्या तिच्या आयुष्याविषयी झरीन खाननं अनेक गोष्टी सांगितल्या. त्यावेळी तिनं सांगितलं की तिला एक कार्डिअ‍ॅक सर्जन व्हायचं होतं. त्याविषयी बोलताना झरीन खाननं सांगितलं की 'माझा प्रवास अचानक आणि सोपी होती. मी एक कार्डिअ‍ॅक सर्जन होण्यापासून एका वयानंतर लग्न करण्याचा देखील प्लॅन केला होता.'

4/7

झरीन खानच्या कार्डिअ‍ॅक सर्जन होण्याची इच्छा ऐकताच भारतीला आश्चर्य झालं. झरीननं याविषयी पुढे झरीन खान म्हणाली, 'मी अभ्यासात खूप चांगली होते. मी आयुष्यात जे काही प्लॅन केलं, ते पूर्ण केलं. मी कधीच अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता आणि तेच झालं.' 

5/7

त्यानंतर झरीनला पुढे विचारण्यात आलं की अभिनेत्री होण्याविषयी तिनं कधी का विचार केला नाही? तर त्यावर झरीन खाननं तिच्या शाळेत आणि कॉलेजच्या दिवसांची आठवण काढली आणि सांगितलं की त्यावेळी तिचं वजन खूप जास्त होतं. 

6/7

झरीन खाननं पुढे सांगितलं की 'शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना तिचं वजन हे 100 किलो पेक्षा जास्त होतं आणि ती टॉमबॉय होती. माझी आई हार्ट पेशेंट असल्यानं मला कार्डिअ‍ॅक सर्जन व्हायचं होतं. तिची इच्छा होती की मी त्याचा अभ्यास करू आणि मग त्यानंतर तिची सर्जरी करू. हा माझ्या संपूर्ण कुटुंबाचा प्लॅन होता, जो अपयशी ठरला.'

7/7

झरीन खाननं पुढे सांगितलं की ती अभिनेत्री होण्यासाठी ट्रेनिंग घेत होती आणि त्यासाठी तिनं तिचं वजन देखील कमी केलं होतं. याविषयी सांगत झरीन म्हणाली, 'मला वाटलं की कॉलिफिकेशननुसार माझ्यासाठी ही योग्य नोकरी असेल आणि या सगळ्यात पैसा देखील होता. त्या दरम्यान, माझं वजन देखील कमी झालं होतं आणि एका फॅनप्रमाणे माझी भेट ही सलमान खानशी झाली आणि माझं आयुष्य बदललं. तर झरीननं 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.'