IPL मालकांच्या बैठकीत काव्या मारनने केल्या 'या' चार शिफारशी, बीसीसीआयला टेन्शन!

IPL owners meeting with BCCI : मुंबईतील बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएलचे मालक आणि बीसीसीआयचे अधिकारी यांच्यात बैठक 31 जुलै रोजी पार पडली. 

| Aug 01, 2024, 16:46 PM IST
1/7

IPL संघ मालकांची बैठक

या बैठकीत सर्व संघांच्या मालकांनी हजेरी लावली होती. शाहरूख खान अन् नेस वाडिया यांच्यात मतभेद झाल्याचं समोर आलं. 

2/7

काव्या मारन

अशातच सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन देखील बैठकीला उपस्थित होती. त्यावेळी काव्याने काही मुद्दे स्पष्टपणे मांडले.

3/7

7 खेळाडू रिटेन

आयपीएलमध्ये कमीतकमी 7 खेळाडू रिटेन करता यायला हवे, असं स्पष्ट मत काव्या मारनने बैठकीत मांडलं आहे.

4/7

7 खेळाडू कोणते?

त्या 7 खेळाडूंपैकी परदेशात/भारतीय/अनकॅप्ड रिटेंशनवर मर्यादा नसावी, असंही काव्या मारनने यावेळी म्हटलं आहे.

5/7

रिटेन्शन

आयपीएल लिलावात रिटेन्शन/RTM बद्दल खेळाडूंशी चर्चा करण्याचा पर्याय उपलब्ध असावा, अशी मोठी मागणी काव्या मारनने केली आहे.

6/7

मेगा लिलाव

त्याचबरोबर दरवर्षी लिलाव होतात मात्र, दर पाच वर्षांनी मेगा लिलाव पार पडावा, अशी मागणी देखील काव्या मारनने या बैठकीत केली आहे.

7/7

निता अंबानी

दरम्यान, आयपीएल मालकांच्या बैठकीला मुंबई इंडियन्सच्या मालकीन निता अंबानी यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली होती.