Sai Pallavi Birthday : लव लेटरमुळे मार खाल्लेल्या साई पल्लवीबाबतच्या 9 इंटरेस्टिंग गोष्टी
Sai Pallavi Birthday : आपल्या नॅच्युरल ब्युटीने प्रत्येकाला प्रेमात पाडणारी अभिनेत्री साई पल्लवीचा आज वाढदिवस. सौंदर्य आणि निरागसता याचं समिकरण असलेली साई पल्लवी आज नॅशनल क्रश आहे. अशा या साई पल्लवीच्या 9 इंटरेस्टिंग गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीत, ते जाणून घेऊया.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| May 09, 2024, 09:19 AM IST
2015 साली मल्याळम ब्लॉकबस्टर सिनेमा 'प्रेमम मलार' या सिनेमातून तिने संपूर्ण जगाचं लक्षवेधून घेतलं ती अभिनेत्री साई पल्लवीचा आज वाढदिवस. नो मेकअप... नॅच्युरल ब्युटी अशी ओळख असलेली साई पल्लवी ही साऊथची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तुम्ही साई पल्लवीचे जबरदस्त चाहते असाल तर तुम्हाला या गोष्टी माहित असायलाच हव्यात.
1/8
जेव्हा साई पल्लवी प्रेमात पडले
लाखो हृदयाची धडकन असलेली साई पल्लवी जेव्हा प्रेमात पडते... साई पल्लवी सातवीमध्ये असताना एका मुलाच्या प्रेमात पडली होती. एवढंच नव्हे तर साई पल्लवीने आपल्या मनातील भावना त्या मुलासमोर पत्राद्वारे व्यक्तही केली होती. पण तिचं हे पत्र घरच्यांना मिळालं तेव्हा तिला जबरदस्त मार देण्यात आला. तिने हा किस्सा विराट पर्वम सिनेमाच्या सीनचा दाखला देत सांगितला होता.
2/8
करोडोंच्या जाहीरातीला दिला नकार
3/8
साई पल्लवीची रोखठोक मत
साई पल्लवी तिच्या रोखठोक मतांसाठी देखील लोकप्रिय आहे. साई पल्लवीने जाहिरात नाकारल्यावर तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने म्हटलं की, 'मी या जाहीरातीतून मिळणाऱ्या पैशांचं काय करणार? घरी जाईन आणि तीन चपाती, भात खाईन. आपल्याकडे जो सौंदर्याच्या रंगाचा समज आहे, तो चुकीचा आहे. हा भारतीय रंग आहे. आपण परदेशी लोकांकडे जाऊन ज्यांचा रंग पांढरा कसा? असा प्रश्न विचारतो का? '
4/8
डॉक्टर साई पल्लवी
9 मे 1992 रोजी तामिळनाडूच्या कोटागिरी येथे जन्मलेल्या साई पल्लवीला सिनेमाच्या दुनियेत येण्याची इच्छा नव्हती. साई पल्लवी एक व्यावसायिक डॉक्टर आहे. त्यांनी वैद्यकशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. तिला कार्डियोलॉजिस्ट व्हायचे होते. 2014 मध्ये, जेव्हा ती शिकत होती, तेव्हा तिला 'प्रेमम' चित्रपटात 'मलार'च्या भूमिकेसाठी ऑफर मिळाली. या चित्रपटासाठी तिला साऊथचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, त्यानंतर साई पल्लवीने मागे वळून पाहिले नाही.
5/8
धर्माबाबत बोलली साई पल्लवी
साई पल्लवी अभिनय आणि निर्णयासोबत आणि बेबाक बोलण्यामुळे देखील चर्चेत असते. धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेविरोधातही आपलं परखड मत मांडल होतं. साई पल्लवी कश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर मत मांडलं होतं. सोशल मीडियावर साई पल्लवीचं हे विधान अतिशय चर्चेत होतं आणि ती ट्रोल देखील झाली होती.
6/8
'प्रेमम' पहिला सिनेमा नाही
7/8