'या' दोन महिलांचे फोटो शेअर करत सचिनने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

आज जागतिक महिला दिन आहे आणि याचं दिनाचं औचित्य साधून सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली. 

| Mar 08, 2024, 20:41 PM IST
1/7

आजच्या दिवसानिमित्त सचिनने फोटो शेअर केलेत. यावेळी त्याने खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

2/7

या फोटोतील प्रसंग कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडले आहेत.   

3/7

सचिनने यावेळी दोन महिलांचे फोटो पोस्ट करून म्हटलंय की, भारतात आणि जगात गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे महिला क्रीडा क्षेत्रात उदयास आल्या आहेत, हे पाहून खूप उत्साह वाढतो. 

4/7

2008 मध्ये जेव्हा 26/11 चा हल्ला झाला तेव्हा भारताने इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला होता. हा विजय संपूर्ण भारतासाठी खूप भावनिक होता, असं सचिनने लिहिलंय.

5/7

सचिनने पुढे लिहिलंय की, मी ज्यांच्यासोबत हा विजय साजरा केला ती पहिली व्यक्ती एक महिला होती. मी त्या भावना महिला ग्राउंड स्टाफसोबत शेअर केल्या. तो क्षण आजही माझ्यासाठी खूप खास आहे.

6/7

एवढ्या वर्षांनंतर 2024 मध्ये जॅसिंथा कल्याण ही भारताची पहिली महिला पीच क्युरेटर बनली. पण मला आशा आहे की, आम्ही भविष्यात आणखी अशा बऱ्याच महिला पाहू, असंही त्याने पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 

7/7

अशा प्रकारे खास पद्धतीने सचिनने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.