आली लग्न घटकी समीप... ऋतुराजच्या हातवारील मेहंदी पाहिली का? उत्कर्षाबरोबरचे Photos Viral

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi: इंडियन प्रिमिअर लिगमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चषक जिंकल्यानंतर ऋतुरात आणि त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पवार मैदानावर एकत्र सीएसकेचं सेलिब्रेशन करताना दिसून आले. मात्र आता या दोघांच्या मेहंदीचे फोटो समोर आले असून ऋतुराजनेही हातावर मेहंदी काढली आहे. ऋतुराजने हातावर काढलेल्या मेहंदीमधील हॅशटॅग चर्चेचा विषय ठरत आहे. पाहूयात या कार्यक्रमातील काही फोटो...

Swapnil Ghangale | Jun 02, 2023, 15:34 PM IST
1/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

इंडियन प्रिमिअर लिगच्या 2023 च्या पर्वात जेतेपदावर नाव कोणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने जेतेपद पटकावल्यानंतर अहमदाबदच्या मैदानावर जंगी सेलिब्रेशन झालं. या सेलिब्रेशनंतर आता आणखीन एका सेलिब्रेशनमध्ये सीएसकेचे खेळाडू लवकरच सहभागी होतील असं चित्र दिसत आहे.

2/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

अहमदाबादच्या मैदानावरील सेलिब्रेशननंतर चेन्नईचा सलामीवीर आणि मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडही अगदी उत्साहात दिसून आला. ऋतुराजचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खास करुन त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचे फोटो चर्चेत होते. आता या दोघांच्या मेहंदीचे फोटो समोर आलेत. यामध्ये ऋतुराज त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबर दिसत आहे.

3/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

आता ऋतुराजच्या मेहंदीचे काही फोटो समोर आले असून ते तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ऋतुराज आणि त्याची होणारी पत्नी बाजूबाजूला बसल्याचं दिसत आहे.

4/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

चेन्नईच्या संघानेनंतर त्यांच्या संघातील खेळाडूंच्या नातेवाईकांबरोबरही फोटो सेशन केलं. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते खेळाडूंच्या पत्नींचाही समावेश होता. विशेष म्हणजे यात ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचाही फोटो होता.

5/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

ऋतुराजने यंदाच्या पर्वामध्ये संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी बरीच मेहनत केली. त्याच्या फलंदाजीचा संघाला खरोखरच चांगला फायदा झाला. शेवटच्या सामन्यात ऋतुराजने 16 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या.

6/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

ऋतुराजचं लग्न ठरल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. मात्र त्याची पत्नी कोण आहे यासंदर्भातील खुलासा अगदी अंतिम सामना होईपर्यंत करण्यात आलेला नव्हता. तरी सीएसकेने अंतिम सामना जिंकल्यानंतर त्याची होणारी पत्नी त्याच्यासोबत मैदानावर सेलिब्रेट करताना दिसली.

7/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

ऋतुराज त्याची गर्लफ्रेण्ड उत्कर्षा पवारबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. 3 जून रोजी दोघे लग्नबंधनात अडणार आहेत हे आता ऋतुराजच्या मेहंदीवरुन स्पष्ट झालं आहे. हे दोघे अमहदाबादच्या मैदानात एकत्र सीएसकेचा विजय साजरा करताना दिसून आले.

8/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

दोघांचा धोनीबरोबरचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. सीएसकेच्या अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या या फोटोत धोनी मध्यभागी बसला असून त्याच्या एका बाजूला ऋतुराज तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा बसलेली आहे.

9/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

मागील अनेक वर्षांपासून ऋतुराज आणि उत्कर्षा रिलेशनमध्ये असल्याचं सांगितलं जातं. उत्कर्षा ही मुळची पुण्याची आहे. मागील वर्षी या दोघांचा जीममधील एक फोटो व्हायरल झाला होता. आता या दोघांचे मेहंदीचे फोटो समोर आले आहेत. ऋतुराजनेही हातावर मेहंदी काढली आहे.

10/10

Ruturaj Gaikwad Wedding Mehendi Ceremony Photos With To Be Bride Utkarsha Pawar

ऋतुराजने हातावर काढलेल्या मेहंदीवर एक हॅशटॅग आणि लग्नाची तारीख लिहिलेली आहे. तर दुसऱ्या हातावर बॅट आणि दोघांच्या नावाची अद्याक्षरे काढलेली आहेत. हातावरील हॅशटॅगमध्ये 'ऋतुराज कॉट उत्कर्षा' असं लिहिलेलं आहे.