रशियाच्या चौकाचौकात रणगाडे; बंडखोर इशारा देत म्हणाले, "लवकरच नवा राष्ट्राध्यक्ष..."

Wagner Rebellion Vladimir Putin: रशिया आणि युक्रेनदरम्यान मागील दीड वर्षांपासून अधिक काळापासून सुरु असलेल्या युद्धामध्ये (Russia Ukraine War) युक्रेनसाठी टाकलेल्या ट्रॅपमध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) स्वत: अडकल्याचं पहायला मिळत आहे. 25 हजार सैन्यशक्ती असलेल्या 'वॅगनर ग्रुप' (Wagner Group) नावाच्या मोठ्या लष्करी गटाने रशियाविरोधातच बंड पुकारलं असून युक्रेनमधून यू-टर्न घेत रशियावरच चाल करण्यास सुरुवात केलीय. थेट पुतिन यांना सत्तेवरुन खाली खेचण्याची भाषा या गटाने केली असून या गटाचं नेतृत्व पुतिन यांचाच एक निकटवर्तीय करत आहे.

| Jun 24, 2023, 17:18 PM IST
1/14

Wagner Rebellion Vladimir Putin

रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाची (Russia Ukraine War) झळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाच बसताना दिसत आहे. पुतिन यांना त्यांच्याच एका माजी सहकाऱ्याने चॅलेंज केलं असून थेट पुतिन यांची सत्ता उलथून टाकण्याची भाषा या व्यक्तीने केली आहे. लवकरच देशाला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळेल असंही या व्यक्तीने म्हटलंय.

2/14

Wagner Rebellion Vladimir Putin

रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असलेल्या युद्धामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अडचणीत सापडले आहेत. एकेकाळी पुतिन यांचा स्वयंपाक्या असलेल्या व्यक्तीनेच आता त्यांना आव्हान दिलं आहे.

3/14

Wagner Rebellion Vladimir Putin

युक्रेनवर रशियाच्या बाजूने लढताना हल्ला करणाऱ्या 'वॅगनर ग्रुप'च्या (Wagner Group) तुकडीने बंडखोरी केली आहे. या गटाने मॉस्कोच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याने मॉस्कोला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे.

4/14

Wagner Rebellion Vladimir Putin

'वॅगनर ग्रुप'चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या नेतृत्वाखाली ही बंडखोरी झाल्यानंतर रशियातील काही शहरं आणि लष्करी तळ या गटाने ताब्यात घेतले आहेत.

5/14

Wagner Rebellion Vladimir Putin

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मोठी चूक केल्याचं 'वॅगनर ग्रुप'चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन यांनी म्हटलं आहे. तसेच पुतिन यांना सत्तेमधून पायउतार व्हावं लागणार असल्याचा दावाही प्रोगोझिन यांनी केला आहे. पुतिन यांनी या आव्हानाला उत्तर देताना आपण हे बंड मोडून काढणार असून 'वॅगनर ग्रुप'ला चिरडून टाकू असं म्हटलं आहे. 

6/14

Wagner Rebellion Vladimir Putin

पुतिन यांनी आपल्या भाषणादरम्यान फारच चुकीचे शब्द वापरले असून देशाला लवकरच एक नवा राष्ट्राध्यक्ष मिळणार आहे, असा दावा प्रोगोझिन यांनी केला आहे.

7/14

Wagner Rebellion Vladimir Putin

येवगेनी प्रोगोझिन यांच्या नेतृत्वाखालील गटाने रशियामधील 2 महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला आहे. तसेच आम्ही 3 हेलीकॉप्टरही पाडल्याचा दावा या बंडखोर गटाने केला आहे.

8/14

Wagner Rebellion Vladimir Putin

येवगेनी प्रोगोझिन यांच्या गटाने आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा दलाकडून फारच कमी विरोध होत असून आपण मॉस्कोकडे वाटचाल करत असल्याचंही सांगितलं आहे. 'वॅगनर ग्रुप'मध्ये एकूण 25 हजार सैनिक असल्याचं सांगितलं जात आहे.

9/14

Wagner Rebellion Vladimir Putin

या बंडखोरीवर पहिली प्रतिक्रिया पुतिन यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून नोंदवली आहे. "रशिया आपल्या भविष्यासाठी कठोर संघर्ष करत आहे. त्यामुळेच आपण त्या सर्व गोष्टी सोडून देणं गरजेचं आहे ज्या आपल्याला कमकुवत बनवत आहेत," असं आवाहन रशियन राष्ट्राध्यक्षांनी केलं आहे.

10/14

Wagner Rebellion Vladimir Putin

रशियाचं भविष्य काय असेल हे सध्या सुरु असलेल्या संघर्षामधून स्पष्ट होणार आहे. सध्या एक राष्ट्र म्हणून आपण आपले मतभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे, असंही पुतिन यांनी पत्रकाद्वारे जारी केलेल्या आपल्या संबोधनात म्हटलं आहे.

11/14

Wagner Rebellion Vladimir Putin

आज आपण ज्या गोष्टींचा सामना करत आहोत हा अंतर्गत विश्वासघात केल्याचा प्रकार आहे. आपल्याला देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता आहे. जो कोणी बंडखोरांच्या बाजूने जाईल त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. बंडखोरांना साथ देणाऱ्यांना कायद्याला आणि रशियन लोकांना स्पष्टीकरण द्यावं लागेल, असं पुतिन यांनी संतापून म्हटलं आहे.

12/14

Wagner Rebellion Vladimir Putin

सध्या देशात जे काही सुरु आहे हे आपल्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं आहे. याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. आम्ही आमच्या लोकांच्या प्राणांसाठी आणि सुरक्षेसाठी लढत आहोत. त्यामुळेच मतभेद विसरुन आपण एकत्र येण्याची गरज आहे. या शसस्त्र बंडखोरीला आम्ही सडेतोड उत्तर देणार आहोत, असं पुतिन यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे.  

13/14

Wagner Rebellion Vladimir Putin

खासगी हितांसाठी देशाबरोबर विश्वासघात झाला आहे. मात्र आम्ही आमच्या नागरिकांचं संरक्षण करणार, असं पुतिन यांनी स्पष्ट केलं आहे. संरक्षण मंत्रालय, अंतर्गत संरक्षण खातं, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड गटांकडून पुतिन यांना माहिती पुरवली जात आहे. रशियन संसदेची इमारत ड्यूमाचं संरक्षण वाढवण्यात आलं आहे. 

14/14

Wagner Rebellion Vladimir Putin

मॉस्कोच्या दिशेने 'वॅगनर ग्रुप' वाटचाल करत असल्याने राजधानीच्या शहरात दहशतवादविरोधी मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. 'वॅगनर ग्रुप'ला तोंड देण्यासाठी रशियन संरक्षण मंत्रालय, रशियन लष्कराची चर्चा सुरु आहे. दरम्यान रोस्तोव शहरामधील लष्करी केंद्र 'वॅगनर ग्रुप'ने ताब्यात घेतलं आहे.