राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्सव साजरा; पाहा फोटो

नागपूर :  दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज रेशीमबाग मैदानावर साजरा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पूर्ण गणवेशात पोहोचले होते. सरसंघचाक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं असून स्वयंसेवकांच्या कवायतीही झाल्या. यावर्षी या उत्सवाला सुप्रसिद्ध गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. 

Oct 05, 2022, 10:36 AM IST
1/8

दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज रेशीमबाग मैदानावर साजरा झाला.

2/8

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पूर्ण गणवेशात पोहोचले होते.

3/8

 सरसंघचाक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं असून स्वयंसेवकांच्या कवायतीही झाल्या.

4/8

यावर्षी या उत्सवाला सुप्रसिद्ध गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांची प्रमुख अतिथी लाभली. 

5/8

विजयादशमी उत्सवादरम्यान आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत भाषणात म्हणाले की, विदेशी आक्रमणामुळे काही धर्म पंथ देशात बनले. मात्र त्यांचे पूर्वज आपलेच होते. सत्य, करुणा, शुचिता, तप हाच खरा धर्म आहे. पुजापद्धती परिस्थितीनुसार बदलतात. मात्र धर्माची ही चार मूल्ये कायम असतात. यातील एकही मूल्य ढळले तर अधर्म वाढतो. म्हणूनच अस्पृश्यता अधर्म आहे, जाती-पातीवरून विषमता अधर्म आहे.

6/8

'आरोग्य ही महत्त्वाची बाब आहे. सर्वांना स्वस्त व सुलभ उपचार मिळायला हवे. प्लुरोपॅथिक उपचारपद्धती मिळायला हवी. सरकारच्या धोरणामुळे योगासनाची मान्यता वाढत आहे. मात्र लोकांची सवय बदलली आहे का. कचरा कुठे टाकतो, पर्यावरण, परिसर स्वच्छ ठेवतो का या गोष्टींचा विचार करायला हवा. समाजाच्या सहयोगाशिवाय व्यवस्था यशस्वी होत नाही.'असं देखील सरसंघचालक भाषणात म्हणाले.

7/8

'राजकीय स्वतंत्रतेसोबत सामाजिक स्वतंत्रता आवश्यक असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.नियम, कायदे बनत आहे, मात्र लोकांच्या मनात विषमता असते. ती मनातून निघाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. मंदिर, पाणी, स्मशान सर्वांसाठी एक असावे. लहान गोष्टींवरून वाद व्हायला नको. तर आर्थिक, राजकीय स्वतंत्रता प्रत्येकापर्यंत पोहोचविणाऱ्या सामाजिक स्वतंत्रता होईल.'असं देखील सरसंघचालक भाषणात म्हणाले.

8/8

'275 जिल्ह्यांत रोजगार देण्यासंदर्भात स्वयंसेवकांकडून कार्य सुरू झाले आहे. लघुउद्योग, सहकार, कृषी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार. यात समाज सर्वाधिक सहभागी असतात. सरकार जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतात की नाही यावर सर्वांनी लक्ष ठेवले पाहिजे. मात्र समाजानेदेखील पुढाकार घेतला पाहिजे.' असं देखील सरसंघचालक भाषणात म्हणाले.