RCB ने टाकला मोठा डाव, फक्त 3 खेळाडूंना केलं रिटेन, स्टार गोलंदाजाला केलं बाहेर

RCB IPL 2025 Retaintion List : नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल 2025 साठीच्या मेगा ऑक्शनपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी आपल्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली. यात आरसीबीने केवळ 3 खेळाडूंना रिटेन केलं असून इतरांना डच्चू दिला आहे. 

Pooja Pawar | Oct 31, 2024, 19:39 PM IST
1/5

आरसीबीने गुरुवारी रिटेन्शन लिस्ट जाहीर करून सर्वांना धक्का दिला. मेगा ऑक्शनपूर्वी त्यांनी केवळ तीन खेळाडूंनाच रिटेन केलं असून यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि गोलंदाज यश दयाल यांचा समावेश आहे. 

2/5

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रेंचायझी मेगा ऑक्शनपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, कर्णधार फाफ डू प्लेसिस इत्यादींना रिटेन करेल अशी अपेक्षा होती. मात्र आरसीबीने सिराज आणि प्लेसिस सारख्या स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे हे खेळाडू मेगा ऑक्शनमध्ये उतरतील. 

3/5

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार  प्रत्येक फ्रेंचायझीला 6 खेळाडू रिटेन करण्याची सूट देण्यात आली होती. आरसीबीने केवळ तीन खेळाडूंनाच रिटेन केलं असल्याने आता त्यांच्याकडे ऑक्शनच्यावेळी तीन RTM कार्ड असतील. 

4/5

आरसीबीने माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला 21 कोटी देऊन रिटेन केले. तर रजत पाटीदारला 11 कोटी आणि यश दयालला 5 कोटी देऊन रिटेन केलं आहे. त्यामुळे आता ऑक्शनसाठी आरसीबीच्या पर्समध्ये तब्बल 83 कोटी रुपये शिल्लक आहेत. ज्यातून फ्रेंचायझी आयपीएल ऑक्शनमधून खेळाडू विकत घेऊन संघ बांधणी करू शकते. 

5/5

आयपीएल 2025 साठीचं मेगा ऑक्शन 24 किंवा 25 नोव्हेंबर रोजी यूएईमध्ये पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतं आहे. मात्र याबाबत बीसीसीआयने अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. ऑक्शनमध्ये RTM कार्डचा वापर करून आरसीबी त्यांनी रिटेन न केलेल्या खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात.