ती पोस्ट.... ते नातं... ; Rishabh Pant - Urvashi Rautela खरंच रिलेशनशिपमध्ये?

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुडकीच्या नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला दिल्लीला हलवण्यात आले आहे. हा अपघात इतका भयंकर होता पंतच्या कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे. दरम्यान, त्यानंतर त्या सगळ्यांचे लक्ष हे अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) पोस्टनं वेधले आहे. 

Dec 30, 2022, 13:25 PM IST
1/5

Rishabh Pant and Urvashi Rautela Relationship

उर्वशीनं एका मुलाखतीत 'आरपी'नं एकदा तिला भेटण्यासाठी हताश होऊन 16 वेळा मिस कॉल केले होते. 2018 मध्ये उर्वशी आणि ऋषभ हे रिलेशनशिपमध्ये आले होते, पण त्याच वर्षी त्यांचा ब्रेकअप झाला, असे म्हटले जाते. 

2/5

Rishabh Pant and Urvashi Rautela Relationship

उर्वशीला ऋषभसोबत असलेले तिचे रिलेशनशिप हे अधिकृत करायचे होते. पण रिपोर्ट्सनुसार, ऋषभला त्याचे रिलेशनशिप कोणालाही कळू द्यायचे नव्हते आणि यामुळे त्यानं तिचा नंबर व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केला होता.

3/5

Rishabh Pant and Urvashi Rautela Relationship

उर्वशीच्या मॅनेजरनं तेव्हा सांगितलं की तिनेही पंतचा नंबर ब्लॉक केला होता कारण या जोडप्याने एकमेकांशी प्रेमसंबंध संपवण्याचे आणि एकमेकांशी बोलणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

4/5

Rishabh Pant and Urvashi Rautela Relationship

उर्वशीशी कथित ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच ऋषभ ईशासोबत रिलेशनशिपमध्ये आला आणि त्यानं जानेवारी 2021 त्याच्या रिलेशनशिपविषयी माहिती सोशल मीडियावरून दिली. 

5/5

Rishabh Pant and Urvashi Rautela Relationship

उर्वशी आणि ऋषभमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकमेकांना ट्रोल केले होते. त्यानंतर आता उर्वशीनं ऋषभच्या अपघातानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मी प्रार्थना करते असे म्हटले आहे.