Gen Z च्या रिलेशनशिपच्या डेटिंग टर्मने डोकं चक्रावून जाईल, एकदा वाचाच

Gen Z च्या रिलेशनशिपच्या डेटिंग टर्मने डोकं चक्रावून जाईल, एकदा वाचाच 

| Jul 06, 2024, 16:57 PM IST

Gen Z ला समजून घेणे खूप कठीण आहे. या जनरेशनची विचार पद्धती वेगळी आहे. रिलेशनशिपबाबत ही जनरेशन काय विचार करते पाहा? 

1/8

Gen Z जनरेशन

1997 ते 2012 पर्यंत जन्मलेली मुलं ही Gen Z जनरेशन म्हणून ओळखली जाते. या जनरेशनमध्ये सोशल मीडियाची प्रचंड क्रेझ आहे. या जनरेशनच्या मुलांची रिलेशनशिपमध्ये डेटिंगची टर्म वेगळी आहे. 

2/8

ड्राय डेटिंग

ड्राय डेटिंग म्हणजे यामध्ये कपल दारुच्या प्रभावाशिवाय अनौपचारिकपणे भेटणे होय. अर्थपूर्ण संभाषणे आणि अस्सल कनेक्शनवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे आधुनिक डेटिंगचा एक महत्त्वाचा पैलू बनतो.

3/8

सिच्युवेशनशिप

सिच्युवेशनशिप हे असं नातं आहे ज्यामध्ये पार्टनरची एकमेकांशी कोणतीही भावनिक गुंतागुंत असते. यामध्ये फक्त शारीरिक आकर्षणाला महत्त्व असते. 

4/8

बेंचिंग

बेंचिंग हा एक रोमँटिक पर्याय आहे. यामध्ये ते नात्यात तर असतात पण यासोबतच इतर पार्टनरचा देखील विचार करत असतात. जर आताचं नातं फार काळ नाही टिकलं तर दुसऱ्या व्यक्तीचा विचार करणे सोपे होते. 

5/8

ब्रेडक्रम्बिंग

या डेटिंग टर्ममध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला योग्य ते अटेंन्शन देतो. आपण या नात्यामध्ये इंटरेस्टेड असल्याचंही सांगतो. पण त्या नात्यामध्ये तेवढी खरी किंमत नसते. हे वागणं मॅन्युपलेट करण्यासारखं आहे. यामध्ये त्या व्यक्तीला दुय्यम वागणूक दिली जाते. 

6/8

घोस्टिंग

घोस्टिंग या रिलेशनशिपचा टर्म असा आहे की, या नात्यामध्ये विश्वास नसतो. अचानक कारण न सांगता ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या जीवनातून निघून जाते. महत्त्वाचं म्हणजे यावर कुणीही कुणाला जाब विचारु शकत नाही. 

7/8

लव्ह बॉम्बिंग

या टर्ममध्ये कपल आपल्या प्रेमाचं मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करतात. एकमेकांसोबत डेटिंगला जाणे, गिफ्ट्स देणे. प्रेमाचं प्रदर्शन करणे हे या लव्ह बॉम्बिंगमध्ये दाखवण्यात येतं. एकदा का हनीमुन पिरियड्स संपला की, तर एकमेकांमधील इंटरेस्ट कमी होते. समोरच्या व्यक्तीला आपल्याला वापरुन सोडल्याची भावना यामध्ये येऊ शकते. 

8/8

झॉम्बिइंग

घोस्टिंग टर्मच्या विरुद्ध आहे झॉम्बिइंग. यामध्ये पार्टनर न सांगता निघून गेला तर त्याला जाऊ द्या. पण तो जर अचानक निघून आला तर त्याला पुन्हा तुमच्या जीवनात प्रवेश मिळू शकतो.