Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन सोहळा प्रत्यक्षात अनुभवायचाय?, 'येथे' करा बुकिंग

Republic Day Parade Ticket Booking: 26 जानेवारी रोजी होणाऱ्या संचलनात देशाचे लष्करी सामर्थ्य आणि विविधतेचे दर्शन घडत असते. ही वैभवशाली परेड तुम्हाला पाहायची असेल तर त्यासाठी तिकीट काढावे लागते. याचा तपशील जाणून घेऊया.

| Jan 24, 2024, 12:23 PM IST
1/8

Republic Day: सर्वसामान्यांनाही अनुभवता येतो राजपथावरील संचलन सोहळा, 'येथे' करा बुकिंग

Republic Day 2024 Watch Parade Live on Rajpath online and offline booking Details

Republic Day 2024 Parade Booking : भारतीय प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी देशभरात सुरु आहे. शाळा, महाविद्यालय, सोसायटी, सरकारी आस्थापनांमध्ये यावेळी ध्वजारोहण केले जाते. दरम्यान दरवर्षी 26 जानेवारीला राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावरील सोहळा आपण टीव्हीवर  पाहतो. हा सोहळा प्रत्यक्षात पाहणे ही एक पर्वणी असते. सर्वसामान्य नागरिकांना हा सोहळा पाहता येतो. यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून बुकींग करावी लागते. याबद्दल जाणून घेऊया. 

2/8

अधिकृत वेबसाइटवर नोंदणी

Republic Day 2024 Watch Parade Live on Rajpath online and offline booking Details

पथसंचलन पाहण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. येथे  तुम्हाला राजपथ सोहळ्याच्या नोंदणीची लिंक दिसेल. येथे तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख भरा. मोबाईलवर आलेला ओटीपी टाका. 

3/8

पर्याय निवडा

Republic Day 2024 Watch Parade Live on Rajpath online and offline booking Details

FDR प्रजासत्ताक दिन परेड, प्रजासत्ताक दिन परेड किंवा बीटिंग द रिट्रीट असे पर्याय तुम्हाला दिसतील. यातील तुम्हाला हवा तो पर्याय निवडा. तुमचे ओळखपत्र अपलोड करा आणि सोहळ्यावेळी स्वत:जवळ ठेवा. 

4/8

बुकिंगचा तपशील आणि क्यूआर कोड

Republic Day 2024 Watch Parade Live on Rajpath online and offline booking Details

तुम्ही ऑनलाइन माध्यमातून तिकीट खरेदी करु शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन बँकिंग किंवा UPI चा पर्याय तुम्ही वापरु शकता. पेमेंट झाल्यावर ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल. येथे तुम्हाला बुकिंगचा तपशील आणि क्यूआर कोड देण्यात येईल. 

5/8

ऑफलाइन तिकिटे

Republic Day 2024 Watch Parade Live on Rajpath online and offline booking Details

प्रजासत्ताक दिन परेडची ऑफलाइन तिकीट विक्री ही 7 जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही विक्री 25 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. आठवड्याच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 आणि रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत तिकिटे विक्री केली जाणार आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी ही तिकीट विक्री केंद्र उपलब्ध आहेत.

6/8

अधिकृत विक्री केंद्र

Republic Day 2024 Watch Parade Live on Rajpath online and offline booking Details

ऑफलाइन तिकीट खरेदीसाठी अधिकृत विक्री केंद्रांवर किंवा नियुक्त प्रजासत्ताक दिन तिकीट काउंटरवर जा. येथे ओळखपत्र दाखवून आणि पेमेंट करुन तुम्हाला तिकीट मिळू शकेल.

7/8

तिकीटाचे दर

Republic Day 2024 Watch Parade Live on Rajpath online and offline booking Details

तिकीटांची कॅटेगरी आणि संख्या भरा.आरक्षित जागांसाठी 500 रुपये तर अनारक्षित जागांसाठी 100 रुपये आकारले जातात. एका व्यक्तीला 4 तिकिटे विकत घेता येऊ शकते. लांबच्या अनारक्षित जागेसाठी 20 रुपये तिकीट दर आहेत.

8/8

तिकीट दाखवून प्रवेश

Republic Day 2024 Watch Parade Live on Rajpath online and offline booking Details

तुमचे ई-तिकीट किंवा ऑफलाइन तिकीट स्वत:जवळ ठेवा. 26 जानेवारीला हे तिकीट आणि तुमचे ओळखपत्र दाखवून तुम्हला पथसंचलन पाहण्यासाठी प्रवेश दिला जाईल.