बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री आहेत मातृत्वाच्या सुखापासून वंचित, एकीनं तर तब्बल 14 वेळा...

Actresses who do not have kids: बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की, त्यांचा विवाह होऊन अनेक वर्षे झाली पण त्या मातृत्त्वाच्या सुखापासून वंचित राहिल्या आहेत. काही एक्ट्रेसेसनी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सही घेतल्या तरी देखील त्यांच्या घरात पाळणा हललाच नाही.

Feb 09, 2023, 13:41 PM IST
1/5

Actresses who do not have kids

रेखा (Rekha)  एव्हरग्रीन अभिनेत्री अशी ओळख मिळवलेल्या रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी विवाह केला होता. परंतु अवघ्या एका दिवसांत त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मुकेश अग्रवाल यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यानंतर रेखा यांनी दुसरा विवाह केला नाही. त्यामुळे रेखा यांना मातृत्त्वाचं सुख कधी मिळूच शकलं नाही.

2/5

Actresses who do not have kids

हेलन (Helan) पहिलं लग्न मोडल्यानंतर हेलन यांनी फिल्म राइटर सलीम खान यांच्याशी दुसरा विवाह केला. सलीम खान यांचा देखील हा दुसरा विवाह होता. मात्र, हेलन यांना आपत्य झालं नाही. अखेर त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव अर्पिता आहे.

3/5

Actresses who do not have kids

सायरा बानो (Sayara bano) सायरा बानो यांनी सन 1966 मध्ये त्यांच्या पेक्षा तब्बल 22 वर्षे मोठे असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी विवाह केला होता. दोघांनी खूप प्रयत्न केल्यानंतर देखील त्यांना संतती प्राप्त झाली नाही. मेडिकल कॉम्प्लिकेशनमुळे या दाम्पत्याला मूलबाळ होऊ शकलं नाही

4/5

Actresses who do not have kids

शबाना आझमी (Shabana Azami) शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांच्याशी संसार थाटला. परंतु, त्यांना देखील मातृत्त्वाचं सुख मिळू शकलं नाही. शबाना या जावेद अख्तर यांच्या सेकंड वाईफ आहेत.

5/5

Actresses who do not have kids

कश्मीरा शाह (Kashmira Shaha) फिल्म आणि टीव्ही एक्ट्रेस कश्मीरा शाह ही देखील आई बनू शकली नाही. कश्मीरा हिने तब्बल 14 वेळा प्रयत्न केले पण तिला त्यात यश मिळालं नाही. अखेर कश्मीरा हिने सलमान खानच्या सल्ल्यानंतर सरोगेसीची मदत घेतली आणि तिला दोन अपत्ये झालीत.