टच करायची गरज नाही, बोटाच्या इशाऱ्यावर चालणारा फोन; Realme Narzo 70 Pro 5G फोन लाँच

Realme Narzo 70 Pro 5G या फोनमध्ये खास फिचर देण्यात आले आहे. यामुळे हा फोन टच न करता बोटांच्या इशाऱ्यावर काम करतो. 

Mar 19, 2024, 16:51 PM IST

Realme Narzo 70 Pro 5G : Realme कंपनीने जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme Narzo 70 Pro 5G हा बहुचर्चित फोन अखेर लाँच झाला आहे. जाणून घेवूया या फोनचे बेस्ट फिचर्स.

1/7

सर्व स्मार्टफोन हे टचस्करीन आहेत. मात्र, आता एक असा फोन लाँच झाला आहे जो टच न करताही बोटाच्या इशाऱ्यावर काम करतो.

2/7

8 GB रॅम सह 128 GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. 

3/7

फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे. तर,  16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 

4/7

फोनमध्ये MediaTek डायमेंशन 7050 5G प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेचा तगडा बॅटरीबॅकअप आहे.

5/7

Realme फोनमध्ये रेनवॉटर स्मार्ट टच सपोर्टसह 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे. यात HDR10 Plus सर्टिफिकेशनसह 120 Hz रिफ्रेश रेट आणि 2000 nits पीक ब्राइटनेस मिळतो.

6/7

Realme  Narzo 70 Pro 5G स्मार्टफोनचे सर्वात खास फिचर म्हणजे या फोनमध्ये क्रिएटिव्ह एअर जेश्चर कंट्रोल उपलब्ध आहे. या फीचरमुळे फोनला स्पर्श न करताही फक्त हाताच्या जेश्चरने अर्थात बोटांच्या इशाऱ्यावर फोनची स्क्रीन कंट्रोल करता येवू शकता. 

7/7

Realme Narzo 70 Pro 5G स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा एक बजेट फोन आहे.