मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंगचे काम पूर्ण

 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी नुतनीकरण व दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणे व्यवस्थापनाला यश आले आहे. 

Jun 13, 2023, 00:01 AM IST

Mumbai Airport Maintenance: छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport Maintenance) 
धावपट्टीचं रिकार्पेटिंग पूर्ण झाले आहे.  विमानतळाच्या सेवांवर कोणताही परिणाम न होऊ देता पूर्ण काम पूर्ण झाल आहे. यामुळे पुढील दहा वर्षासाठी धावपट्टी अर्था रनवे मजबूत करण्यात  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीला यश आले आहे. 

1/6

धावपट्टीची दुरुस्ती करण्यासाठी दररोज 200 कर्मचारी काम करत होते.

2/6

मुंबई विमानतळाने विमान कंपन्या, विमान वाहतूक प्राधिकरण आणि त्याच्या अनेक भागधारकांच्या मदतीने दुरुस्ती आणि देखभाल योजना राबवली होती. 

3/6

9 डिसेंबर 2022 रोजी सुरू झालेला रीकार्पेटिंग उपक्रम 10 जून 2023 रोजी पूर्ण झाला आहे. 

4/6

लँडिंग आणि टेक-ऑफ दरम्यान सतत आणि सुरक्षित विमान वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी धावपट्टीचं रिकार्पेटिंगचे काम करणे गरजेचे आहे. 

5/6

दिवसभरात या विमानतळावरून 900 पेक्षा अधिक विमानांचे उड्डाण होते. 

6/6

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.