तुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या

RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

Pravin Dabholkar | Sep 11, 2023, 13:02 PM IST

RBI Currency Notes Update: दैनंदिन जीवनात व्यवहार करताना अनेकदा आपल्याला फाटलेल्या, मळलेल्या नोटा मिळतात. कधीकधी एटीएममधूनदेखील अशा नोटा येतात. मग अशावेळी काय करायचे आपल्याला सुचत नाही. पण रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने यासंदर्भात नियम जारी केले आहेत. हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

1/10

तुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes

RBI Currency Notes Update: दैनंदिन जीवनात व्यवहार करताना अनेकदा आपल्याला फाटलेल्या, मळलेल्या नोटा मिळतात. कधीकधी एटीएममधूनदेखील अशा नोटा येतात. 

2/10

आरबीआयचे नियम

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes

मग अशावेळी काय करायचे आपल्याला सुचत नाही. पण रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने यासंदर्भात नियम जारी केले आहेत. हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. 

3/10

नोटांची देवाणघेवाण

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes

तुमच्याकडे फाटलेली, कापलेली, खराब झालेली नोट असेल तरी काळजी करु नका. कारण या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

4/10

नोट रिफंड नियम

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes

आरबीआय (नोट रिफंड) नियमांनुसार, फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा बदलल्या जाऊ शकतात.आरबीआय आणि इतर कोणतीही बँक अशा नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. 

5/10

बँक खाते उघडण्याची गरज नाही

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes

एखाद्या व्यक्तीला मळलेल्या किंवा फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करायची असेल तर बॅंकेत खाते असणे बंधनकारक नाही. जवळच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन कधीही हे काम करता येऊ शकेल. ही सेवा सर्व कामकाजाच्या दिवसांत तुम्ही कधीही जाऊन नोटा बदलू शकता.

6/10

फाटलेल्या नोटांची किंमत किती?

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes

खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटांचे मूल्य RBI आणि बँकेच्या स्वतःच्या नियमांनुसार ठरवते. ग्राहकांना नोटेची पूर्ण, अर्धी किंवा अगदी किंमतही मिळू शकते. 

7/10

कमी फाटली असेल तर योग्य किंमत

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes

नोट कमी फाटली असेल तर योग्य किंमत मिळू शकते. पण खूपच खराब झाली असेल तर तुम्हाला निम्मी किंमत मिळू शकते किंवा अजिबात मिळणारदेखील नाही.

8/10

50 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या नोटा

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes

50 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या नोटा खराब झाल्या तर तुम्हाला पूर्ण किंमत मिळू शकते. नोट 50 टक्क्यांहून अधिक खराब झाली असेल तर तुम्हाला एक रुपयाही न मिळण्याची शक्यता अधिक आहे.

9/10

RBI चा नियम काय सांगतो?

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes withdrawn Bank ATM

आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटेची लांबी 16.6 सेमी, रुंदी 6.6 सेमी आणि क्षेत्रफळ 109.56 चौरस सेंटीमीटर आहे.जर तुमची नोट 88 चौरस सेंटीमीटर असेल तर तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळेल. नोट 44 स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर फक्त अर्धी किंमत मिळेल.

10/10

500 रुपयांच्या नोटेबाबत काय नियम?

RBI Guidelines on indian Currency Torn Crumpled Notes withdrawn Bank ATM

500 रुपयांच्या नोटेची लांबी 15 सेमी, रुंदी 6.6 सेमी आणि क्षेत्रफळ 99 चौरस सेंटीमीटर आहे. अशा परिस्थितीत, 500 रुपयांच्या नोटेचा आकार 80 चौरस सेंटीमीटर असल्यास पूर्ण परतावा दिला जाईल, तर 40 चौरस सेंटीमीटर असल्यास अर्धा परतावा दिला जाईल.