Rasha Thadani : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींच शाळा सोडताच बॉलिवूडमध्ये पदार्पण, जाणून घ्या

Actresses Debut at Young Age: राशा थडानी हिने नुकतेच शालेय शिक्षण पूर्ण केले असून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती फक्त 17 वर्षांची आहे. पण तिच्या आधी अशाच अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत, ज्यांनी शाळा सोडताच बॉलिवूडचा मार्ग धरलाय.

Jan 21, 2023, 21:31 PM IST

Actresses Debut at Young Age: बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिची मुलगी राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा थडानी हिने नुकतेच शालेय शिक्षण पूर्ण केले असून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती फक्त 17 वर्षांची आहे. पण तिच्या आधी अशाच अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत, ज्यांनी शाळा सोडताच बॉलिवूडचा मार्ग धरलाय. या अभिनेत्री कोण आहेत, हे जाणून घेऊयात. 

1/5

राशा थडानीने नुकतेच तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. आता ती बॉलिवूड डेब्यूची तयारी करत आहे. ती पहिल्यांदाच अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणसोबत काम करणार असल्याचे वृत्त आहे. 

2/5

दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करणार आहेत. हा चित्रपट अॅक्शन अॅडव्हेंचर प्रकारातला असणार आहे. याबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नसले तरी लवकरच त्याचे शूटिंगही सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. 

3/5

या यादीत आलिया भट्टचाही समावेश आहे. शाळा सोडून ती करण जोहरची विद्यार्थिनी झाली होती. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण करताना आलिया केवळ 19 वर्षांची होती. पण नंतर तिच्या मेहनतीमुळे आणि अभिनयावरील प्रेमामुळे ती टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली.

4/5

2019 च्या स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटा दरम्यान अनन्या पांडेही खूपच लहान होती. शाळेतून पास होताच तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. करण जोहरच्या चित्रपटातून तिने पदार्पण केले तेव्हा ती अवघ्या १८ वर्षांची होती.

5/5

उर्वशी रौतेलानेही लहान वयात पदार्पण केले होते. सिंग साहेब द ग्रेट या चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेव्हा ती केवळ 19 वर्षांची होती. आज उर्वशी आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे.