Astro Tips For Money: पैसे जपून वापरा! नव्या आठवड्यात 'या' चार राशींच्या लोकांचा खर्च वाढू शकतो

नवा आठवडा सुरु झाला की एक नवा उत्साह असतो. ऑफिसच्या पहिल्या दिवसासह संपूर्ण आठवड्याभराचं प्लानिंग आपण करत असतो. मग त्यामध्ये सहकाऱ्यांसोबत बाहेर जेवायला जाणं, मित्रांसह पार्टी, कुटुंबासोबत आऊटिंग अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे आर्थिक नियोजनही करावं लागत. पण हा नवा आठवडा चार राशींसाठी (Zodiac Signs) मात्र खर्चिक असण्याची शक्यता आहे.   

Mar 13, 2023, 21:13 PM IST
1/5

2/5

वृषभ- आर्थिक आघाडीवर तुम्हाला फार विचार करावा लागणार आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यताही आहे. पण गरज नसणाऱ्या अनेक गोष्टींवर पैसे खर्चही होतील. या आठवड्यात आपला अहंकार नियंत्रणात ठेवा, अन्यथा तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होत वाईट प्रतिमा निर्माण होऊ शकते.   

3/5

मिथून - या आठवड्यात तुमची फिरण्याच्या आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल. मात्र हा आठवडा तुम्हाला कौटुंबिक आयुष्यात शांतता देईल.   

4/5

सिंह - घरात एखाद्या शुभ कार्याचं आयोजन होण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागू शकतात. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकतो. मानसिक तणावातही वाढ होण्याचे संकेत आहेत.   

5/5

कन्या - आपल्या सुख सुविधांसाठी तुम्ही गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च करण्याची शक्यता आहे. तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. या आठवड्यात आर्थिक तोट्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात वाहन चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे.